Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कात्रज घाटात एसटी-रिक्षाचा भीषण अपघात

रिक्षा चालक ठार, तिघे जखमी

marathinews24.com

पुणे – भरधाव एसटी बस आणि रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, तिघे प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज घाट बोगदा संपल्यानंतर पुण्याकडे येताना दुसऱ्या वळणावर घडली. अपघातात रिक्षा चालक हनुमंत रमेश हंगरगे (वय ४२, रा. बिबवेवाडी) यांचा मृत्यू झाला.

जुन्या वादातून मारहाण करणारा अटकेत – सविस्तर बातमी

राजेश इंगवले (वय ४८), दशरथ निरगुडे (वय ४३) शहाजी लक्ष्मण शिवदे (वय ४१ ) हे तिघे जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी एसटी चालक जालिंदर विष्णु शिंदे (वय 53, जि. सांगली) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेटहून सांगली जिल्ह्यातील विटाकडे एसटी (MH 10 DT 2697) जात होती. तर खेड शिवापूरकडून स्वारगेटच्या दिशेने रिक्षा (MH 12 GS 9695) येत होती. त्यावेळी कात्रज घाट संपल्यावर बोगद्यातून बाहेर निघताना दुसऱ्या वळणावर दोन्ही वाहनात जोरदार धडक झाली. त्यामुळे रिक्षातील चारही प्रवाशी बाहेर फेकले गेले. अपघातात ते गंभीरपणे जखमी झाले.आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले.

चारही जखमीना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रिक्षा चालक हनुमंत रमेश हंगरगे यांचा मृत्यू झाला. इतर तिघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी एसटी चालक याला ताब्यात घेण्यात आले आहे, दरम्यान, अपघातानंतर कात्रज घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाताचा पुढील तपास आंबेगाव पोलीस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×