डोळ्यात मिरचीपूड टाकून केली बेदम मारहाण, लोणी काळभोरमधील घटना
marathinews24.com
पुणे – देवाच्या पूजेच्या वादातून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना लोणी काळभोरमध्ये घडली आहे. संबंधिताच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्यांना दांडक्याने मारहाण करीत गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना १७ मे रोजी घडली असून, १९ मे रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिस्तूलाच्या धाकाने तरूणाला प्रवासादरम्यान लुटले – सविस्तर बातमी
प्रदीप तुकाराम जाधव (वय ४५ रा. सावतामाळी मंदीराजवळ, लोणी काळभोर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी अनिल उत्तम जाधव, महेश राजू जाधव, राजू जाधव, पप्पू मोरे, संगीता राजू जाधव, अरूणा मोरे (सर्व रा. लोणी काळभोर )यांच्यासह पाच ते सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप जाधव आणि आरोपींमध्ये देवाच्या पूजेवरून वाद झाले होते. त्याच रागातून १७ मे रोजी आरोपी अनिल जाधव हा प्रदीपकडे पाहून थुंकला होता. त्याचा जाब विचारला असता, त्यांनी प्रदीपला दांडक्याने मारहाण करून जखमी केले. भांडणात त्यांच्या पत्नीने मध्यस्थी केल्याचा राग आल्यामुळे टोळक्याोन त्यांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर प्रदीप हे घरी गेले असता, टोळक्याने त्यांचा पाठलाग करून गाठले. त्यांच्यावर दांडक्याने, रॉडने हल्ला करून गंभीररित्या जखमी केले. त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून आरोपी जाधव यांच्यासह इतर पाच ते सहाजणांनी त्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संगीता माळी तपास करीत आहेत.