Breking News
वै. हरिभक्त परायण सखाराम महाराज तडस निर्व्यसनी ग्रुप तर्फे आषाढी एकादशीनिमित्त घाटी रुग्णालय व अनाथ आश्रमात फराळ वाटपसस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १०२ पिशव्यांचे संकलनदिवसा रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीचा एलसीबीने केला पर्दाफाशमाहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीच्या आमिषाने फसवणूकपुण्यात अल्पवयीनावर गाेळीबार करणारा गुंड अटकेतपुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खूनशहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूगुंतवणुकदारांची ८८ कोंटींची फसवणूक; पसार झालेल्या आरोपीचे प्रत्यार्पणआरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६ निमित्त २६ जुलै रोजी पुणे–जेजुरी–बारामती मार्गावरील वाहतुकीत बदलपुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

पिस्तूलाच्या धाकाने तरूणाला प्रवासादरम्यान लुटले

शिवीगाळ केल्याने झाडल्या गोळ्या, जीम मालक जखमी

वारजे- मामुर्डीदरम्यान घडली घटना

marathinews24.com

पुणे – पिस्तूलाचा धाक दाखवून मारहाण करीत टोळक्याने प्रवाशी तरूणाकडील तीन हजारांची रोकड आणि १० हजारांचा मोबाइल चोरून नेला. ही घटना १९ मे रोजी पहाटे चारच्या सुमारास वारजे- मामुर्डी प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी कोंढवे धावडे परिसरात राहणार्‍या ४१ वर्षीय तरूणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्‍याच्या मोटारीवर गोळीबार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कोंढवे धावडे परिसरात राहायला असून, १९ मे रोजी पहाटेच्या सुमारास ते मामुर्डीला जाण्यासाठी वारजेत थांबले होते. त्यावेळी त्यांनी मोटारीला हात दाखविल्यानंतर मोटार चालक त्यांच्याजवळ येउन थांबला. त्यावेळी गाडीत चारजण आधीच प्रवास करीत असल्याचे दिसून आले. तक्रारदार तरूणही मोटारीत बसल्यानंतर चालकाने गाडी मार्गस्थ केली. काही अंतरावर गेल्यानंतर मोटारीत बसलेल्या आरोपींनी तरूणाला पिस्तूलाचा धाक दाखवून मारहाण केली. त्यांच्याकडील ३ हजारांची रोकड आणि मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर पुढे काही अंतरावर टोळक्याने त्यांना मोटारीतून खाली उतरविले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×