Breking News
दुकानातून टायर चोरणारा गजाआडराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मानउप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूलभारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामपुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंदमोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

विद्यार्थी हितासाठी फाउंडेशन कार्यरत राहणार- ऍड अनुजा पाटील

विद्यार्थी हितासाठी फाउंडेशन कार्यरत राहणार- ऍड अनुजा पाटील

धायरीतील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत

marathinews24.com

पुणे –  विद्यार्थी हितासाठी फाउंडेशन कार्यरत राहणार- ऍड अनुजा पाटील – सामाजिक जाणिवेतून सुरू झालेली अनुजा सुशांत पाटील फाउंडेशन विद्यार्थी हितासाठी काम करत आहे. शेतकरी वर्गातून पुढे आलेले हे कुटुंब आज एका उदात्त भावनेतून काम करीत आहे. शिक्षणासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. यापुढेही असेच काम सातत्याने सुरू राहील,” असे मत सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व ॲड. अनुजा पाटील यांनी येथे व्यक्त केले.

खरीप व रब्बी हंगामातील १६ पिकांसाठी पीकस्पर्धा जाहीर – सविस्तर बातमी 

धायरीमध्ये नारायणराव सणस विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज मधील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले. ज्ञानाच्या वाटेवर नवचैतन्याचा प्रकाश पेरणाऱ्या अशा अत्यंत अर्थपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन आज करण्यात आले. यावेळी विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्याना त्यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप सुपूर्त करण्यात आले. ही रक्कम मुलांना संस्थेकडून त्यांच्या खात्यात देण्यात येणार आहे.

ऍड पाटील म्हणाल्या, शिष्यवृत्तीच नव्हे तर ती गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील आशेचा किरण आहे. या संकल्पनेचा पाया माणुसकीच्या मूल्यावर, शिक्षणप्रेमावर आणि समाजभानाच्या जाणिवेवर. रचण्यात आला आहे. ही संस्था शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि गरजूंच्या कल्याणासाठी अत्यंत संवेदनशीलपणे कार्य करते.” डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक विद्यानंद मानकर म्हणाले, “मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांना मदत करण्याचा याचा उद्देश आहे. अनुजा सुशांत पाटील फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे मदत केली जात त्यांनी नमूद केले. यामुळे विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक ती मदत देणार असल्याचेही ते म्हणाले. मुलांनीही त्यांच्या आयुष्यात इतरांना मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी फाऊंडेशनचे वित्त नियंत्रक रोहन पवार, संचालक गणेश चव्हाण, प्रकल्प संचालक श्रीराम चव्हाण, प्रकल्प अधिकारी मदन आडे, प्राचार्य रोडे सर, उपप्राचार्या रोहिणी पवार डॉ. सुभाष राठोड आणि विद्यालयाचा शिक्षकवृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. संस्थेच्या वतीने शिष्यवृत्तीच्या रकमेमुळे पालक आणि विद्यार्थी वर्ग समाधानी असल्याचे यावेळी मत व्यक्त करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top