Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

वाघोलीत महिलेची सोनसाखळी हिसकावणारा अल्पवयीन ताब्यात

वाघोलीत महिलेची सोनसाखळी हिसकावणारा अल्पवयीन ताब्यात

गुन्हे शाखेच्या युनीट सहाची कामगिरी

marathinews24.com

पुणे – रस्त्याने पायी जाणार्‍या महिलेचा पाठलाग करून सोनसाखळी हिसकावणार्‍या दुचाकीस्वार अल्पवयीन चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनीट सहाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १ लाखाची सोनसाखळी, दुचाकी असा १ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केले. यापुर्वी त्याच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. पथकाने ४८ तासांत चेन स्नॅचिंग करणार्‍याला मुद्देमालासह ताब्यात घेतल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू – सविस्तर बातमी 

वाघोली परिसरातील केसनंद रस्त्यावरून २१ ऑगस्टला महिला पायी जात होती. त्यावेळी दुचाकीस्वार दोघा चोरट्यांनी महिलेला धक्का देउन तिच्या गळ्यातील १ लाखांची सोनसाखळी हिसकावून नेली होती. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या युनीट सहाकडून तपास करण्यात येत होता. पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आजूबाजूचे परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. अनोळखी आरोपींचे फोटो प्राप्त करीत आरोपीतांची ओळख निश्चित केले. गुन्ह्यातील आरोपी हा गणेशनगर, तळवडे, निगडी, पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. त्याठिकाणी सापळा रचून पथकाने विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांतकापुरे, निलेश साळवे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×