Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

मुंढव्यातील ब्युटीपार्लर चालक तरुणीचा खून प्रकरणाचा छडा

आर्थिक वादातून खून करणारा गजाआड

marathinews24.com

पुणे – शहरातील मुंढवा परिसरात ब्युटीपार्लर चालक तरुणीचा खून प्रकरणाचा छडा गुन्हे शाखेने लावला. अनैतिक संबंध, तसेच आर्थिक वादातून खून केल्याचे तपासात उघडकीस आले असून, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. गोरखनाथ देवराव शिंदे (वय ४४, सध्या रा. चंदननगर, मूळ रा. बीड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आफरीन सलीम पटाण (वय २९, सध्या रा. वडगाव शेरी, मूळ रा. पालघर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत आफरीनच्या लहान बहिणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

हवाई दलाच्या तळात बेकायदा प्रवेश करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (५ मे) आफरीन एका महिला ग्राहकाच्या घरी गेली होती. मध्यरात्री मुंढव्यातील केशवनगर भागात कचरा डेपोजवळ रस्त्याच्या कडेला तिचा मृतदेह सापडला होता. याबाबतची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. सुरुवातीला पोलिसांना अपघाताची घटना वाटली होती. तिचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाकडून या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत होा. पोलिसांनी मुंढवा केशवनगर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. चित्रीकरणात आरोपी शिंदे याची मोटार दिसली. आफरीन त्याच्या मोटारीत बसल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

एक वर्षांपूर्वी शिंदे याची आफरीनशी ओळख झाली होती. त्यांच्यात मैत्री झाली. दोघे विवाहित आहेत. त्यांच्यात अनैतिक संबंध होते. २ मे रोजी आफरीनने त्याच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. ५ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आफरीन शिंदेला खराडी बाह्यवळण मार्गावर भेटली. शिंदेने तिला ५० हजार रुपये दिले. तेव्हा आफरीनने त्याच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास कुटुंबीयांना अनैतिक संबंघाची माहिती देईल, अशी धमकी तिने शिंदेला दिली. त्यानंतर शिंदेने मोटारीत तिचा गळा आवळला. आफरीनचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यनंतर त्याने तिचा मृतदेह केशवनगर कचरा डेपाेजवळ टाकून दिल्याचे तपासात उघडकीस आले. पोलिसांनी शिंदे याला अटक केली. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाकाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, विनाकक येवले, प्रफुल्ल जाधव, सुरेश मोरे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×