Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

हवाई दलाच्या तळात बेकायदा प्रवेश करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले

विमानतळ पोलिसंनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – हवाई दलाच्या तळात बेकायदा प्रवेश करणाऱ्या एकाविरुद्ध विमानतळ पोलिसंनी गुन्हा दाखल केला. याबाबत हवाई दलातील शिपाई अंकीश त्रिपाठी (वय ३५, रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३५ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला तरुण हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे.

डेटिंग ॲपवरील ओळखीतून तरुणाला लुटणारे गजाआड – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपाठी हे हवाई दलाच्या सुरक्षा विभागात नियुक्तीस आहे. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर हवाई दलाची जागा आहे. या क्षेत्रात नागरिकांना प्रवेश निषिद्ध आहे. ३ मे रोजी आरोपी नगर रस्त्यावरील सीमाभिंतीवरुन चढून हवाई दलाच्या जागेत प्रवेश करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर हवाई दलाच्या सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा गुन्हा दाखल करण्यात आलेला तरुण हा मानसिक विकाराने ग्रस्त असल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी हवाई दलाच्या जागेत बेकायदा प्रवेश करणारा तरुण सीमा भिंतीवरुन पडल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×