Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

डेटिंग ॲपवरील ओळखीतून तरुणाला लुटणारे गजाआड

वारजे पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – ‘गे डेटिंग ॲप’वरील ओळखीतून तरुणाशी मैत्री करुन त्याला लुटणाऱ्या चोरट्यांना वारजे पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. ओम गणेश वाघमारे (वय २०), गणेश उत्तम माने (वय २७, दोघे रा. वारजे माळवाडी), जगदीश रामू पवार (वय २३, रा. शिवणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार २५ वर्षीय तरुण कर्वेनगर भागात राहायला आहे. त्याची एका अल्पवयीनाशी ‘गे डेटिंग ॲप’वरुन ओळख झाली. अल्पवयीनाने त्याला जाळ्यात ओढून कर्वेनगर भागात भेटण्यासाठी बोलाविले. तेथून त्याला दुचाकीवरुन निर्जन ठिकाणी नेले. अल्पवयीनाने तेथे साथीदारांना बोलावून घेतले. अल्पवयीनाबरोबर असलेल्या साथीदारांनी तरुणाला धमकावून त्याच्याकडून ऑनलाइन पद्धतीने ८ हजार ६०० रुपये घेतले. तरुणाच्या गळ्यातील चांदीची साखळी हिसकावून नेली. त्यानंतर घाबरलेल्या तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रा दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास करुन आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×