बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – तरुणावर खुनी हल्ला करुन पसार होण्याच्या तयारीत असलेल्या हल्लेखोराला बिबवेवाडी पोलिसांनी पाठलाग करुन पकडले आहे. ही घटना २१ ऑगस्टला बिबवेवाडी स्मशानभूमीजवळ घडली होती. प्रदीप पिंटू कश्यप रा. शिवतेजनगर, खडके वस्ती) मयूर रोहिदास चव्हाण वय २० रा. विघ्नहर्तानगर) तेजस सोमनाथ आंबुरे उर्फ भोला वय २६ रा. अप्पर ओटा, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला – सविस्तर बातमी
वादातून टोळक्याने तरूणावर धारदार शस्त्राने वार केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झा ला होता. त्यापार्श्वभूमीवर तपास पथक हल्लेखोरांचा शोध घेताना पोलीस अमलदार संजय गायकवाड, सुमीत ताकपेरे यांना आरोपी हे धायरीत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी राहूल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे, उपनिरीक्षक मालोजी कांबळे, अय्याज दड्डीकर, संजीव कळंबे, दत्ता शिंदे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, रक्षित काळे यांनी केली.
गावठी पिस्तूल बाळगणार्याला अटक, दोन शस्त्रे जप्त
दहतशीसाठी गावठी पिस्तूल बाळगणार्या रेकॉर्डवरील आरोपीला नांदेडसिटी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ९० हजार रुपये किंमतीचे दोन पिस्तुल जप्त केले आहेत. मारुती उर्फ मारी बाळू चव्हाण (वय २६ रा. खडकवासला) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नांदेडसिटी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नांदेडसिटी पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी गावठी पिस्तूल बाळगणारा एकजण खडकवासला परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस अमलदार शुभम चव्हाण, प्रतीक मोरे, मनोहर खराडे यांना मिळाली. पथकाने सापळा रचून मारुती चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुल जप्त केले आहेत. ही कामगिरी उपायुक्त डॉ. सागर कवडे, एसीपी विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक प्रसाद राउत, उपनिरीक्षक गणेश कसबे, उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत, उत्तम शिंदे, अक्षय जाधव, मोहन मिसाळ यांनी केली.























