Breking News
वै. हरिभक्त परायण सखाराम महाराज तडस निर्व्यसनी ग्रुप तर्फे आषाढी एकादशीनिमित्त घाटी रुग्णालय व अनाथ आश्रमात फराळ वाटपसस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १०२ पिशव्यांचे संकलनदिवसा रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीचा एलसीबीने केला पर्दाफाशमाहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीच्या आमिषाने फसवणूकपुण्यात अल्पवयीनावर गाेळीबार करणारा गुंड अटकेतपुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खूनशहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूगुंतवणुकदारांची ८८ कोंटींची फसवणूक; पसार झालेल्या आरोपीचे प्रत्यार्पणआरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६ निमित्त २६ जुलै रोजी पुणे–जेजुरी–बारामती मार्गावरील वाहतुकीत बदलपुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

श्री गणनायक रथातून निघणार ‘दगडूशेठची मिरवणूक

गणपती ट्रस्टचे १३३ वे वर्ष ; यंदाही दुपारी ४ वाजता सहभागी होणार

marathinews24.com

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३३ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला शनिवार (दि ६) रोजी थाटात निघणार आहे. यंदा श्री गणनायक रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली. सलग तिसऱ्या वर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे.

श्री गणेश रत्न रथातून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची विसर्जन मिरवणूक – सविस्तर बातमी

यंदाची प्रतिकृती असलेल्या केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे. दक्षिण भारतीय शैलीतील रथाची निर्मीती करण्यात आली आहे. दक्षिण भारतात जसा लाकडाचा रथ साकारला जातो, तसा हा रथ तयार केला आहे. रथावर ज्याप्रमाणे सप्तरंगांची उधळण केली जाते, तशीच इथेही केली आहे. श्री पद्मनाभ स्वामी हे श्री विष्णूंचे मंदिर असल्यामुळे रथावर ४ गरुडमूर्ती लावण्यात आल्या आहेत. त्यापैकी २ मूर्ती ६ फूट उंचीच्या तर २ मूर्ती ३ फूट उंचीच्या आहेत. रथाचा आकार १६ बाय १६ फूट असून उंची २४ फूट इतकी आहे. रथावर झुंबरे, एलईडी, पार लाईटचे फोकस लावण्यात येणार आहेत. कलादिग्दर्शक विनायक रासकर यांनी हा रथ साकारला आहे.

सांगता मिरवणुकीबाबत माहिती देताना सुनील रासने म्हणाले, मिरवणुकीत मानवसेवा रथ व त्यामध्ये सनई-चौघडा अग्रभागी असणार आहे. मिरवणुकीत स्वरूपवर्धिनीचे पथक, केरळचे चेंदा मेलम पथक असा लवाजमा असेल. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त देखील मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×