Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

पुण्यात वाहतूक उपायुक्त डॉक्टरांची तत्परता, वारकर्‍यावर केले उपचार

पुण्यात वाहतूक उपायुक्त डॉक्टरांची तत्परता, वारकर्‍यावर केले उपचार

फीट्स आलेल्या तरुण वारकऱ्याला वाहतूक उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिले तातडीने प्रथमोपचार

marathinews24.com

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात वाहतूक नियोजनाची जबाबदारी पार पाडणारे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या संवदेशशीलेतेसह तत्परता एका वारकर्‍याच्या कामी आली आहे. वारीतील तरूण वारकर्‍याला आलेल्या फीटमुळे त्रास होउ लागला. त्याचवेळी परिसरात वाहतूकीचे नियोजन करणारे डॉ. भाजीभाकरे यांनी तत्काळ तरूण वारकर्‍याजवळ धाव घेतली. त्यांना वैदकीय मदत लाभल्यामुळे फीटचा त्रास कमी झाला.

ज्येष्ठ वारकऱ्यांना ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2026’ प्रदान – सविस्तर बातमी

वाहतूक नियोजनासोबत वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवातून वारकर्‍यावर प्रथमोपचार करणारे डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या कतृत्वाला अनेकांनी सलाम केला आहे. सोबतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. गुरूवारी (दि.९ ) दोन्ही संताच्या पालखी सोहळ्याचे पुणे शहरात आगमन झाले. तत्पुर्वी शहरातंर्गत रस्ते, वाहतूक बदल, पालखीचे लाईव्ह लोकेशन, ड्युटीवर असलेले वाहतूक कर्मचारी-अधिकार्‍यांचा आढावा उपायुक्त डॉ. भाजीभाकरे यांच्याकडून घेतला जात होता. विविध िंदड्यातील वारकरी आपआपल्या मुक्कामाच्या दिशेने मार्गक्रमण करीत होते. त्याचवेळी एका तरूण वारकर्‍याला फीट्सचा त्रास होउ लागला. तो रस्त्यावर झोपल्याची माहिती मिळताच, परिसरात वाहतूकीचे नियोजन करणारे उपायुक्त भाजीभाकरे यांनी धाव घेतली. संबंधित वारकर्‍यावर प्रथमोपचार करून त्याला आधार दिला.

वाहतूक नियोजनासह वारकर्‍यांचीही सेवा

वारीच्या अनुषंगाने शहरातील विविध भागात वाहतूकीचे नियोजन करण्यात आले असून, गुरूवारी सकाळपासूनच वाहतूक अमलदारांसह अधिकारी बंदोबस्तावर तैनात होते. वारकर्‍यांनी विचारलेल्या पत्त्यासह दिंड्यांची माहिती देणे, चुकलेल्या वारकर्‍यांचा दिंडी प्रमुखांसोबत संवाद घडवून आणणे, दमलेल्या वारकर्‍यांना आधार देणे, स्थानिक नागरिकांना सुरू असलेल्या रस्त्यांची माहिती देउन विनंती करण्याचे काम करण्यात येत होते. त्याचसोबत वारकर्‍यांचीही सेवा करण्याचे काम वाहतूक अमलदारांकडून करण्यात येत होते.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांची सेवा करणे, हे भाग्य आहे. दरम्यान, वारीत त्रास झालेल्या तरूण वारकर्‍यावर तत्काळ प्रथमपचोर केल्याचे समाधान आहे. वाहतूक नियोजनासह माउलींच्या सोहळ्यासाठी लाभलेली संधी पुर्वपुण्याई असल्याची भावना आहे.
डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×