पेरले गीतातून आई- मुलाच्या नात्याची गोष्ट उलगडणार
marathinews24.com
पुणे – आई-मुलाच्या नात्यावर फुंकर घालणारे ‘पेरले’ गीत रसिकांच्या भेटीला – पेरले गीतातून आईच्या आणि मुलाच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट उलगडणार असून सदरील पेरले गीत रसिकांच्या भेटीला आले आहे. एका आईची आणि मुलाच्या हृदयस्पर्शी नात्याबद्दलचे हे गीत असून प्रसिद्ध अभिनेत्री मॉडेल गुरमीत कौर मान या गीताध्ये प्रमुख भूमिकेत त्यांनी काम केले आहे. गुरमीत कौर मान ही एक बहुमुखी अभिनेत्री असून त्यांनी आई आणि मातृत्वाच्या वेगवेगळ्या छटा या गीतातून अद्भुतपणे साकारल्या आहेत.गीताची संकल्पना आणि दिग्दर्शन विवेक सावंत यांनी केले आहे.
यूपीएससी-२०२४ यशस्वितांचा सत्कार सोहळा १२ जुलैला – सविस्तर बातमी
गायक स्वरूप भाळवणकर आणि कविता राम हे असून गीतकार अंजली भाळवणकर यांनी लिहिले आहे. तर छायाचित्रकार जय अधिकारी यांनी केले आहे. गुरमीत कौर मान यांचा व्हसर्व्ह स्टुडिओ या गीताची निर्मिती केली आहे. आई होणे ही घटना प्रत्येक स्त्रीसाठी तिच्या आयुष्यामध्ये अत्यंत सुखद आणि आनंद देणारी असते. सुख-दु:खात मनावरील ओझं हलकं करण्यासाठी ते मुल आईच्या आयुष्यात आनंदाची पेरणी करत असत. कितीही दाट अंधार असला तरी आशेचा किरण उगवणारच, असा सकारात्मक संदेश गाण्यातून मिळत आहे. अशाच गोड नात्यावर भाष्य करणारं हे गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गीत सर्वांना आवडणार असून प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेईल. असे गुरमीत कौर मान यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.