Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

काशीविश्वेश्वर मंदिरात निनादले संगीताचे सूर

काशीविश्वेश्वर मंदिरात निनादले संगीताचे सूर

त्रिपुरारा संगीत महोत्सवात रंगली मैफल

marathinews24.com

पुणे – त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शनिवार पेठेतील श्री काशीविश्वेश्वर मंदिरात नातू परिवारातर्फे त्रिपुरारी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात डॉ. रेवा नातू यांनी भगवान शंकर व विष्णू यांच्यावर आधारित शिवहरी आराधना या हरिहर संयोग विषयावर बंदिशी सादर केल्या.

समाजात शांततेच्या वातावणासाठी मध्यस्थी प्रभावी मार्ग – सविस्तर बातमी 

सुरुवातीस राग पुरिया धनश्रीमध्ये मध्यलय झपतालमधील बंदिश सादर केली. त्यानंतर हरिहर आराधना तसेच शिव आणि हरी यांच्यावरील राग भूप, केदार, शंकरा रागातील बंदिशी सादर करून अडाणा रागात चतरंग ऐकविला. गायनाची सांगता भैरवीमधील अभंगाने झाली. त्यांना लीलाधर चक्रदेव (संवादिनी), प्रशांत पांडव (तबला), मृगेंद्र मोहाडकर (बासरी) यांनी समर्पक साथसंगत केली.

डॉ. रतीश तागडे यांनी व्हायोलीन वादनातून राग नन्देश्वरी सादर केला. भक्तिरचनेने त्यांनी व्हायोलिन वादनाची सांगता केली. उत्तरार्धात विदुषी गौरी पाठारे यांचे बहारदार गायन झाले. त्यांनी राग भूप, शंकरा तसेच भक्तिरचना सादर केल्या. स्वानंद कुलकर्णी (संवादिनी), प्रशांत पांडव (तबला) यांच्या साथीतून मैफलीत रंग भरले. महोत्सवात शिवानी पेठकर, अनुजा महाजन, सायली भाटे, मल्हार पटवर्धन आणि कृत्तिका महाशब्दे यांनी स्वर आणि तानपुरा साथ केली. डॉ मृणाल धोंगडे यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश नातू, अनुराधा नातू व डॉ रेवा नातू यांनी कलाकारांचा सत्कार केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×