Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

गुरूवार पेठेत ज्वेलर्समध्ये चोरी; ६८ लाखांचे दागिने चोरीला

घोरपडे पेठेतील घरातून ५५ हजारांचा ऐवज चोरीला

खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – शहरातील गुरूवार पेठेतील ज्वेलर्स शॉपवर रविवारी (दि.१४) चोरट्यांनी ६७ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. १४) मध्यरात्री गुरूवार पेठेतील फुलवाला चौकात माणिक ज्वेलर्समध्ये घडली आहे. याप्रकरणी ज्वेलर्स शॉपचे मालक विनोद परमार (४१, रा. मुकुंदनगर) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात ५ पोलीस ठाण्यांना मंजुरी, पोलीस आयुक्तांच्या प्रयत्नांना यश – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी रविवारी (दि. १४) मध्यरात्री गुरूवार पेठेतील फुलवाला चौकात माणिक ज्वेलर्समध्ये चोरी केली. चोरी करण्यासाठी चोरटे पायी आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. अर्धा तास चोर ज्वेलर्स शॉपमध्ये होते. व्यावसायिक चांदीचे होलसेल व्यापारी असल्याने मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने शॉपमध्ये होते. चोरांनी ४० लाख रुपयांचे ४५ किलो वजनाचे चांदीचे पैंजण, १३ लाख ५० हजार रुपयांचे १५ किलो वजनाचे हातातील कडे, चैन, ब्रेसलेट, मासोळी, चांदीचे कॉईन, ९ लाख रुपये किमतीचे १० किलो वजनाच्या मुर्ती, ५ लाख रुपये रोख आणि १० हजारांचा डीव्हीआर असा ६७ लाख ६० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पुढील तपास करत आहेत. चोरीच्या घटनेनंतर डीसीपी संभाजी कदम, एसीपी अनुजा देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. दरम्यान ज्वेलरी शॉपला एकही सुरक्षा रक्षक नाही. शॉपचा लाकडी दरवाजा आणि जाळीचे शटर कटावणीच्या सहाय्याने तोडून ३ चोर दुकानात शिरले. त्यानंतर अर्ध्या तासानंतर पाठीवर गोणीत चोरीचा माल घेऊन पायी जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहेत. ज्वेलरी शॉपच्या समोरच असलेल्या एका इमारतीत ज्वेलरी शॉपमधील कर्मचारी राहतात. सोमवारी (दि. १५) पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यातील कर्मचाऱ्याला दुकानाचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले, त्यामुळे दुकानात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×