Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वनाज मेट्रो आगारातून वातानुकूलन साहित्य चोरी

मार्केट यार्डमधील दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला

कोथरूड पोलिसांकडून चोरट्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – वनाज मेट्रो आगारातून (कार शेड) चोरट्यांनी १ लाख ७७ हजार रुपयांचे वातानुकूलन साहित्य चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मेट्रोतील कर्मचारी प्रवीण भोई यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीच्या खून प्रकरणी पसार आरोपी गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड रस्त्यावरील वनाज मेट्रो स्थानकातील आगारातील कार्यालयात वातानुकूलन यंत्रणेचे साहित्य ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी इमारतीतील खोलीचे कुलूप तोडले. वातानुकूलन यंत्रणेचे साहित्य चोरून चोरटे पसार झाले. भोई यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मेट्रो आगाराची पाहणी केली. तेव्हा साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस हवालदार माळी तपास करत आहेत.

दानपेटी फोडून रोकड चोरी

नाना पेठेतील एका प्रार्थनास्थळाच्या आवारातील दानपेटीचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा हजारांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरू रस्त्यावर प्रार्थनास्थळ आहे. चोरट्यांनी दानपेटीचे कुलूप तोडून रोकड चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस कर्मचारी ओैचरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×