६ मोबाईल, दुचाकी जप्त
marathinews24.com
पुणे – पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून ६ मोबाईल आणि दुचाकी असा १ लाख ८० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. रोहीत सुरेश कांबळे (वय १८ रा. जाधव नगर, गुजरवाडी फाटा, कात्रज) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेची अधिसूचना जाहीर – सविस्तर बातमी
तक्रारदार तरुण १ मे रोजी रात्री आठच्या सुमारास मोबाईल फोनवर बोलत असताना, दुचाकीस्वार दोघा जणांनी त्यांच्याजवळ येऊन पत्ता विचारण्याचा बहाणा केला. त्याचवेळी गाडीवर मागे बसलेल्या चोरट्याने तरुणाच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन नेला होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाला चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे हे आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी हा गुन्हा गुजरवाडीत राहणार रोहीत सुरेश कांबळे, सलमान शेख यांनी केला असल्याची माहिती पथकाला मिळाली.
आरोपीचा शोध घेत असताना रोहीत कांबळे (वय १८) हा भारतनगर येथे मिळुन आला. त्याच्याकडून ६ मोबाईल, दुचाकी असा १ लाख ८० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. जप्त मोबाईल, दुचाकी गाड्यांबाबत तपास चालु आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार,सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली आहे.