Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

रास्ता पेठेत लूटमार करणारे चोरटे गजाआड

गुन्हे शाखेची कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील रास्ता पेठेत एकाला धमकावून त्याच्याकडील ३० हजारांची रोकड लुटून पसार झालेल्या चोरट्यांना गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्यांनी लष्कर भागात एकाला लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अस्लम इस्माइल शेख उर्फ बिल्ला (वय २२), रेहान जमील शेख उर्फ रिहान (वय १९, दोघे रा. म्हाडा वसाहत, ससाणेनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

कोंढव्यात अल्पवयीनाला हाॅकी स्टिकने मारहाण – सविस्तर बातमी

रास्ता पेठेतील शांताई हाॅटेल चौकात आठवडाभरापूर्वी आरोपी शेख यांनी एकाला अडवून त्याच्याकडील ३० हजारांची रोकड लुटली होती. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट एककडून तपास करण्यात येत होता. रास्ता पेठेत लुटमारीचा गुन्हा आरोपी शेख यांनी केल्याची माहिती पोलीस कर्मचारी हेमंत पेरणे आणि नीलेश साबळे यांना तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. चौकशीत आरोपी शेख यांनी रास्ता पेठ, तसेच लष्कर भागातील सरबतवाला चौकात दोघांना लुटल्याची कबुली दिली.

आरोपी अस्लम शेख सराइत असून, त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात २१ गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, उपनिरीक्षक राहुल मखरे, निलेश साबळे, हेमंत पेरणे, अनिकेत बाबर, मयूर भोसले, उमेश मठपती यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×