Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

केजच्या बसस्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ ; बसस्थानकात पोलीस चौकी असताना होतायेत चोऱ्या

तुळशीबागेत महिलेचे दीड लाखांचे दागिने चोरी

महिलेच्या पर्स मधून ३ लाख ३५ हजारांचे दागिने चोरीला

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – भावाच्या लग्नासाठी माहेरी जात असलेल्या विवाहित महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी ३ लाख ३५ हजार रुपयांची सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना दि. १ फेब्रुवारीला दुपारी पावणे चारच्या सुमारास केजच्या बस स्थानकात घडली आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

लोणावळ्यात महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह सापडला – सविस्तर बातमी

केजमधील शिक्षक कॉलनीमध्ये राहत असलेल्या अश्विनी गोविंद घोळवे भावाच्या लग्नासाठी लातूरला।निघाल्या होत्या. त्या नाशिक-लातूर या बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्सची चैन उघडून चोरट्याने १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, मोठे पट्टीचे सोन्याचे गंठण, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके असे ३ लाख ३५ हजार ९८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.

दरम्यान अश्विनी घोळवे व त्यांची मुलगी या दोघी एसटीमध्ये चढत असताना त्यांच्या जवळ अनोळखी दोन महिला व एक मुलगी थांबली होती. अनोळखी महिलांनी त्यांच्या पर्स मधील दागिने हातोहात लांबविल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अश्विनी घोळवे यांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने हे तपास करीत आहेत.

बस स्टँड परिसरात एक पोलीस चौकी आहे. परंतु या चौकीत पुरेसे पोलिस कर्मचारी देऊन गस्त वाढविणे व बस स्टैंड परिसरातील सर्व भाग सीसीटीव्हीच्या कक्षेत येण्याची व्यवस्था झाल्यास चोरीच्या घटनेला आळा बसेल. अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×