Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

हा तर ऋषितूल्य व्यक्तीमत्त्वाचा सन्मान-डॉ. पी. डी. पाटील

हा तर ऋषितूल्य व्यक्तीमत्त्वाचा सन्मान-डॉ. पी. डी. पाटील

आडकर फौंडेशनतर्फे दत्तात्रय अत्रे यांचा अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा

marathinews24.com

पुणे – सामाजिक कार्याबरोबरच ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून अनेक व्यक्तींना मार्गदर्शन करीत, पाठींबा देत आत्मविश्वास वाढविण्याचे कार्य दत्तात्रय अत्रे करत आहेत. त्यांचा सन्मान म्हणजे समाजातील ऋषितुल्य व्यक्तीचा सन्मान आहे, याचा विशेष आनंद असल्याचे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी केले.

मधुमित्र मधुमक्षी पुरस्कारासाठी नामांकन अर्ज करण्याचे आवाहन एक पुरस्कार महिला मधपालकांसाठी राखीव – सविस्तर बातमी 

आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासक, विचारवंत, लेखक, गुरुवर्य दत्तात्रय अत्रे (देहू) यांचा अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा मंगळवारी (दि. २१) आयोजित करण्यात आला होता. अत्रे यांचा सन्मान डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे, आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर, सुलोचना अत्रे मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, ग्रंथभेट असे पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकार भवन, नवी पेठ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. पी. डी. पाटील पुढे म्हणाले, समाजाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्व स्तरातील व्यक्तींसाठी कार्य करत असताना अत्रे यांनी प्रत्येकालाच भक्कम पाठबळ दिले असून त्यांच्या कार्याची दखल आडकर फौंडेशनच्या माध्यमातून घेतली जात आहे, हे कौतुकास्पद आहे. आडकर फौंडेशनचे कार्य हे पुण्याच्या इतिहासात नोंद घ्यावी असे असून समाजातील गुणवंत व्यक्तींना समाजासमोर आणून गौरविण्यात येणे हे स्पृहणीय आहे.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ज्योतिष शास्त्रात आचार्य समजल्या जाणाऱ्या दत्तात्रय अत्रे यांचा डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते होणारा सन्मान हा जणू नवपंचम योग आहे. अत्रे यांच्या बरोबरचा स्नेह बालपणापासूनचा असून त्यांचे निरपेक्ष मैत्र आपल्याला लाभले आहे, असे सांगून डॉ. मोरे म्हणाले, प्रारब्ध संचित-क्रियमाण या कर्म प्रकारांना केंद्रस्थानी मानून अत्रे यांनी ज्योतीष शास्त्राचा अभ्यास केला आहे. ते एक व्रतस्थ ज्योतिषी असून आपल्या अनुभवातून लोकांना समृद्ध करत आहेत.सचिन ईटकर म्हणाले, अत्रे गुरुजींच्या व्यक्तीमत्वातून सकारात्मकता समोर येते. ते प्रेम आणि जिव्हाळ्यातून सातत्याने मार्गदर्शन करत असतात. पावित्र्य टिकवून ठेवत, दीपस्तंभासारखे कार्य करत त्यांनी माणसात केलेली गुंतवणूक ही वंदनीय आहे.

सत्काराला उत्तर देताना दत्तात्रय अत्रे म्हणाले, आध्यात्मिक अधिष्ठान व विज्ञान यांची सांगड घालत डॉ. पी. डी. पाटील यांनी माझ्यात सकारात्मक बदल आणि ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य केले. त्याच प्रमाणे डॉ. सदानंद मोरे यांच्या सारख्या सुहृदाने मार्गदर्शनातून माझ्यात सखोल अभ्यासाची गोडी निर्माण करत सिद्धांत प्रस्थापित करून मार्गक्रमण करण्याचा मोलाचा सल्ला दिला. डॉ. मोरे हे माझ्यासाठी विज्ञानयुगातील आधुनिक व्यास आहेत. माझ्या आध्यात्मिक व ज्योतिष विषयातील मुशाफिरीत कुटुंबाचा मोलाचा पाठींबा आहे. लोकांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारत गेलो तीच माझी दैवी संपत्ती आहे, हेच माझे संचित आहे. मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×