Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात तरुणावर गोळीबार करणाऱ्यांना अटक, पिस्तूलही जप्त

कोथरूडमध्ये १७ वर्षीय मुलाच्या खुनाचा दोन तासांत छडा

खंडणी विरोधी पथक एकची कारवाई

marathinews24.com

पुणे – जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी तरुणावर गोळीबार करून त्याच्या खूनाचा प्रयत्न करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल तसेच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. साहिल महेंद्रसिंग चव्हाण वय २० व बालाजी रामजी उमाप ( वय २२, दोघेही रा. गुलटेकडी स्वारगेट) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोळीबारात मोजेश शेखापुरे हा तरुण जखमी झाला होता. याप्रकरणी मार्वेâटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

दुचाकीचा कट मारल्याचा वाद, तरूणाचा खूनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी

टोळी वादातून हवेत गोळीबार करून टोळक्याने दहशत माजवली होती. त्यानंतर दोन दिवसांपुर्वी गोळीबाराचा बदला म्हणून टोळक्याने मार्केटयार्ड परिसरातील वखार महामंडळ परिसरात मोजेशवर गोळीबार केला होता. त्यानंतर टोळके पसार झाले होते. टोळक्याचा शोध पोलिस घेत असताना पोलीस अमलदार मयूर भोकरे यांना आरोपींची माहिती मिळाली. दोन्ही आरोपी नांदेड सिटी गेटजवळ जोगेश्वरी मागील बाजूस लपून बसले होते. त्यांच्याजवळ पिस्तूल असून ते पोलिस पथकावर गोळीबार करण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने या भागात चारही बाजूने सापळा रचला.

त्यानंतर पोलीस पथकाने दोघांना पकडून त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केले. तसेच गुन्ह्यात वापरली दुचाकी शोधून जप्त करण्यात आली आहे. ही कामगिरी अपर आयुक्त पंकज देशमुख, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी राहूल आवारे, एसीपी शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप, पोलीस निरीक्षक सुनीता नवले, एपीआय सुधीर कटारे, सिद्धनाथ भापकर, एपीआय राजेश माळेगावे, उपनिरीक्षक सौरभ माने, हवालदार दयानंद तेलंगे, अमर पवार, राजेंद्र लांडगे, रणजीत फडतरे, रहीम शेख, कौस्तुभ जाधव, संदीप सूर्यवंशी यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×