Breking News
दुकानातून टायर चोरणारा गजाआडराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मानउप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूलभारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामपुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंदमोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

पुणे जिल्हातील हजारो माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पुणे जिल्हातील हजारो माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रलंबित शैक्षणिक मागण्या शासनाने त्वरित मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

marathinews24.com

पुणे – शिक्षण क्षेत्रातील विविध धोरणात्मक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ,संस्थाचालक संघटना, विविध शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना अशा महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील विविध संघटना एकत्र येवून शुक्रवार (दि). ११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रातील हजारो शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपल्या प्रलंबित शैक्षणिक मागण्या शासनाने त्वरित मान्य करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाला निवेदन दिले.

पशुसंवर्धन व्यवसायास कृषीसमकक्ष दर्जा देणारे महाराष्ट्र पहिले राज्य- मंत्री पंकजा मुंडे – सविस्तर बातमी 

शालेय शिक्षण विभागाकडे शासन स्तरावर अनेक शैक्षणिक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ,विविध संघटना, शिक्षक आमदार यांनी अनेक वेळा शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी शासनाला प्रत्यक्ष भेटून चर्चा करून तसेच निवेदन देऊन खालील प्रश्न मांडलेले होते, परंतु अद्याप शालेय शैक्षणिक विभागाने ते प्रश्न न सोडविल्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत,शासनाने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे व शैक्षणिक प्रश्न सोडवावेत यासाठी एक दिवस शाळा बंद ठेवून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दिनांक १५ मार्च २०२४ चा संच मान्यता संदर्भातील शासन निर्णय रद्द करावा,शाळा तेथे शिक्षक मिळावेत व मागील २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी,

राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी पदभरती बाबत दिनांक २८ मे २०२५ रोजी शिक्षण संचालक यांनी काढलेले पत्र रद्द करून पदभरतीस मान्यता देण्यात यावी, शिक्षक भरती पोर्टल द्वारे वर्षातून दोनदा करावी, दिनांक ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतरच्या नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार घोषित केल्याप्रमाणे टप्पा वाढ त्वरित देण्यात यावी, वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगाच्या वेतनावर मिळावे. या मागण्या मान्य करण्यासाठी शासनाला दिवेदन देण्यात आले.

सर्व शिक्षकांनी तसेच शिक्षक-शिक्षकेतर संघटनांनी ११ जुलै च्या संपात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य अध्यक्ष तानाजी माने तसेच राज्य सचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले होते,या आवाहनास लाखो शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रतिसाद दिला व आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी शासनास निवेदन देऊन प्रलंबित प्रश्नांबाबत घोषणा दिल्या.

१५ मार्च २०२४ संचमान्यतेच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे राज्यातील अनेक शाळांना शून्य शिक्षक मिळाले आहेत ,पुणे जिल्ह्याचा विचार केला असता पुणे जिल्ह्यातील ७४ शाळांना शून्य शिक्षक मिळाल्याने शिक्षकाविना शाळा चालवायच्या कशा असा प्रश्न मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्यासमोर निर्माण झाला असून विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे.

महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाने केलेल्या आवाहनास पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ विविध शिक्षक-शिक्षकेतर संघटना,संस्थाचालक संघटना यांनी एक दिवसीय लक्षणीय आंदोलनास प्रतिसाद देत शाळा तेथे शिक्षक मिळावेत यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढून निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम तसेच शिक्षण आयुक्त कार्यालयात शिक्षण सहसंचालक हरून आतार आहे व शिक्षण उपसंचालक राजेश शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या नेतृत्वाखाली व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ह्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

१५ मार्च २०२४ चा संच मान्यता शासन निर्णय रद्द होणे महत्त्वाचे आहे. अनेक शाळांमध्ये २० पटाची अट पूर्ण होत नसल्यामुळे तीन शिक्षक मिळालेले नाहीत त्यामुळे अनेक मुली त्या त्या गावातील शिक्षणापासून वंचित राहतील हा धोका मात्र सगळ्यांना निर्माण होईल. पूर्वीच्या संच मान्यतेच्या निकषानुसार संच मान्यता करण्यात याव्यात. नंदकुमार सागर, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ.

शासन सातत्याने शिक्षणावर विविध प्रयोग करत आहेत. त्यामुळे शाळा व विद्यार्थ्या शासनाच्या प्रयोगामुळे हवालदिल झाला आहे. २५ मार्च २०२४ चा शासन निर्णय हा अतिशय अन्यायकारक आहे या निर्णयामुळे अनेक शाळा शिक्षकविना झाल्या असल्याने बंद होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. हा शासन निर्णय रद्द झाला नाही तर अनेक अनुदानित विशेषतः मराठी शाळा बंद होतील अशी भिती आहे. प्रसाद गायकवाड, अध्यक्ष, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ

यावेळी संस्था संघटनेचे अध्यक्ष विजय कोलथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जी के थोरात प्रवक्ते वसंतराव ताकवले पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर संस्थाचालक संघटनेचे गणपतराव बालवडकर, महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर संघटनेचे राज्य कार्यवाहक शिवाजीराव खांडेकर,कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, उपाध्यक्ष कल्याण बरडे,शिवाजीराव कोलते,सेंकडरी सोसायटी चे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे सेवानिवृत्त संघटनेचे सचिव आदिनाथ थोरात कुंडलिक मेमाणे आदींसह मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सचिव शिवाजीराव कामथे यांनी मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top