Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

गॅस कनेक्शन तोडण्याची दिली धमकी, ७ लाखांचा ऑनलाईन गंडा

अतिरेक्यांकडे मोबाइल क्रमांक सापडल्याची बतावणी

सायबर चोरट्याकडून कोंढव्यातील महिलेची फसवणूक

marathinews24.com

पुणे – एमएनजीएल गॅसचे कनेक्शन कापून टाकण्याची धमकी देत साबयर चोरट्यांनी महिलेला तब्बल ७ लाख ४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३० जून ते १ जुलै २०२४ कालावधीत कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता परिसरात घडली आहे. याप्रकरणी अरूणा शरद चाबुकस्वार (वय ५७, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उघड्यावर मद्यपान करीत टोळक्याकडून तरूणाला बेदम मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अरूणा चाबुकस्वार कुटूंबियासह कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. ३० जूनला सायबर चोरट्यांनी महिलेला फोन करून एमएनजीएल गॅस कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. तुमचे गॅसचे बील थकले असून, ते बील जमा न केल्यास गॅसचे कनेक्शन तोडण्याची धमकी दिली. त्यामुळे अरूणा यांनी संबंधिताच्या बँकखात्यात ऑनलाईनरित्या रक्कम वर्ग करण्यास सुरूवात केली. दोन दिवसांत तब्बल ७ लाख ४ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करूनही सायबर चोरट्यांनी त्यांना धमकाविले. संशय आल्यामुळे अरूणाने माहिती घेतली असता, त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैराटकर तपास करीत आहेत.

बतावणीला बळी पडू नका, ऑनलाईन रक्कम पाठवू नका

गॅसचे बील थकल्यास संबंधित कंपनीकडून ग्राहकाला मेजेज पाठविले जातात. त्यासंदर्भात पत्रव्यवहार करून बील जमा करण्याची विनंती केली जाते. प्रत्यक्षात मात्र, सायबर चोरट्यांकडून गॅसचे कनेक्शन कापण्याची धमकी देउन थेट ऑनलाईनरित्या रक्कम उकळली जात आहे. त्यामुळे सायबर चोरट्यांच्या कोणत्याही बतावणीला बळी न पडता ऑनलाईनरित्या रक्कम वर्ग करू नका. जर कोणी तुम्हाला अशारितीने धमकी देउन पैशांची मागणी करीत असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×