Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कंपाऊंडमध्ये घुसुन कामगारांना तसेच तक्रारदारांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमन किसन बेलदरे, मधुकर शेजवळ, रोहीत शेजवळ, सुनिता बाळु शेजवळ, हरिदास पवार, महेश शिवाजी बेलदरे, आशितोष बेलदरे (सर्व रा. वडकी ता. हवलेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अमर मुरलीधर शेवाळे (४६, रा. मांजरी फार्म, शेवाळवाडी) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार वडकी येथील गट क्रमांक १३५० येथे हा प्रकार जून २०२४ ते ३० ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला.

बसमध्ये मुलीच्या सोन्याच्या रिंगा चोरी

हडपसर वाघोली असा बस प्रवास करत असताना १७ वर्षीय अल्पवयीन मुलींच्या कानातील सोन्याच्या रिंगा चोरी करून नेल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्रृती सचिन कोल्हे (१७, रा. मु. पो. केसनंद) हिने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार मुलीला समजल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

कॉम्बो ट्रान्सफर व्हाऊचर सादर करून फसवणूक

कॉम्बो ट्रान्सफर व्हाऊचर सादर करून ३१ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे. आकाश दिपक मोटवाणी (३०, रा. लोट्स प्लॉवर व्हॅली सोसायटी, वानवडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. आयुष राजेश मोटवाणी (३०, रा. कल्याणीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ मे २०२५ ते १९ मे २०२५ दरम्यान आरोपीने तक्रारदार आयुष मोटवाणी यांची बनावट सही करून व ती खरी आहे असे भासवुन कॉम्बो ट्रान्सफर व्हाऊचर बँकेत सादर करून खात्यातून आरोपीने स्वतःच्या पीपीएफ खात्यात ३१ हजारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा

पुणे-अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिच्यावर अत्याचार करणार्‍या एकाला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे. अथर्व विजय गुडेकर (वय १९, रा. स्वप्न नंदिनी, बिल्डींग, शिवणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर बलात्कार, बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी आठ आठवड्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×