Breking News
रात्रशाळेतील जिद्दीचा विजय; पूना नाईट हायस्कूलचा 89.47 टक्के निकालसैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सैनिक दरबार संपन्नशेजाऱ्याकडून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्यसायबर चोरट्यांकडून महिलेची साडे नऊ लाखांची फसवणूककेरळ सहलीच्या आमिषाने पर्यटकांची फसवणूकबी.एससी – एचएचए अभ्यासक्रमाकरीता ३१ मेअखेर अर्ज करण्याचे आवाहनशिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस अर्ज करण्यास मुदतवाढछत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ‘जयतु शंभू’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनमुलांच्या भांडणावरून सुरू झालेला वाद फ्री स्टाईल हाणामारीवर पोहोचलापुण्यात मुसळधार पावसामुळे ५ ठिकाणी झाडे काेसळली

कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने साडेतीन कोटीचा गंडा

तब्बल ४१ जणांची फसवणूक, गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे– आत्मनिर्भर कॉन्सेप्टस इंडिया प्रा.लि. कंपनीचे संचालक व एजंटांनी मिळून ४१ गुंतवणुकदारांची तब्बल ३ कोटी ४८ लाख ९२ हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे. याप्रकरणी चार आरोपी विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कुश चतुर्वेदी , रचना हरिश श्रींगे (रा. उंड्री), मंजुशा शशीकांत क्षिरसागर (रा. बोपोडी) व शशींकात क्षिरसागर (रा. बोपोडी, पुणे) यांच्या विरोधात भादवि कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधीचे संरक्षण ३ व ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२४ कालावधीत घडली आहे. आशिष दत्तात्रय पांडे (वय ४२,रा. शांतीरक्षक सोसायटी, येरवडा) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात पीएमपीएल बसचालकाचा बेदरकपणा प्रवाशाच्या जीवावर – सविस्तर बातमी 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुश चतुर्वेदी याने आत्मनिर्भर कॉन्सेप्टस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुरुवात केली. कंपनीत आरोपी रचना श्रींगे, मंजुशा क्षिरसागर, शशीकांत क्षिरसागर हे एजंट होते. त्यांनी गुंतवणुकदारांना कंपनीत गुंतवणुक केल्यास दरमहिना ८ ते ९ टक्के दराने परतावा देण्याचे अमिष दाखवले. साखळी पध्दतीने हे काम वाढवून इतर गुंतवणुकदार मिळवल्यास अधिक नफा मिळेल अशीही बतावणी केली. त्यानुसार तक्रारदारासह ४० गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी त्यांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले. ८ ते ९ टक्के परतावा देतो असे आमिष दाखवून आरोपींनी गुंतवणुकीची रक्कम ३ कोटी ४८ लाख ९२ हजार रुपये आणि परतावा गुंतवणुकदारांना दिला नाही. स्वत:च्या फायद्यासाठी रकमेचा अपहार करुन आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी बंडगार्ड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस जानराव तपास करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top