Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

कोंढव्यात गावठी पिस्तुलासह तिघांना अटक

एमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्या

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने केली कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील कोंढवा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश असतानाही बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर या प्रकरणातील आणखी तीन संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. प्रकाश तुळशीराम पवार (वय २४, रा. वेदवाडी हौसर, कॅनालजवळ ), मुस्ताक इकराईम शेख (वय २२, रा. आशरफ नगर, कोंढवा ) ओंकार दयानंद पवार (वय २४, रा. अपर इंदिरानगर, पुणे) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने केली.

पुणे स्टेशन परिसरात तरुणाला धमकावून लुटले – सविस्तर बातमी 

आरोपींकडून गावठी बनावटीचे पिस्तुल, जिवंत काडतूस असा ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून शस्त्र बाळगल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात दि. १३ मार्चला रात्री नऊच्या सुमारास काही इसम संशयास्पदरीत्या थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या तीन साथीदारांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौरव देव करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×