शहरात वेगवेगळ्या अपघातात दाेन महिलांसह तिघांचा मृत्यू

1मालवाहू वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

मुंबई-पुणे रस्त्यावरील खडकी रेल्वे स्थानकासमोर अपघाताच्या घडल्या घटना

marathinews24.com

पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगळवार पेठेतील प्रादेशिक परिवहन चौक (आरटीओ), गुलटेकडी, तसेच मुंबई-पुणे रस्त्यावरील खडकी रेल्वे स्थानकासमोर अपघाताच्या घटना घडल्या.

घरासमोर उभा केलेला १२ चाकी ट्रक पळविला – सविस्तर बातमी

आरटीओ चौकात भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिल्याची घटना बुधवारी (१ ऑक्टोबर) सकाळी घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनाली संदीप बेलगमवार (वय ४४, रा. काकडे टेरेस, वारजे माळवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात सोनाली यांचे पती संदीप (वय ४८) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत बेलगमवार दाम्पत्याचा मुलगा प्रणव (वय २१) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी टेम्पोचालक वैभव विनायक जगताप (रा. अंबोजोगाई, जि. बीड) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार संदीप बेलगमवार आणि त्यांची पत्नी सोनाली हे बुधवारी सकाळी आठच्या सुमारास आरटीओ चौकातून निघाले होते. त्या वेळी भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. अपघातात बेलगमवार दाम्पत्य गंभीर जखमी झाले. अपघातानंतर टेम्पोचालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या बेलगमवार दाम्पत्याला खासगी रुग्णालायत दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सोनाली यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.

मालवाहू गाडीच्या (पिकअप) धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुलटेकडी -मार्केट यार्ड रस्त्यावर घडली. पुष्पा सुरेश रुगवाल (वय ७२, रा. महावीर काॅम्प्लेक्स, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश सुरेश रुणवाल (वय ३०) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश रुणवाल यांची आई पुष्पा या बुधवारी (१ ऑक्टोबर) सकाळी साडेसातच्या सुमारास गुलटेकडी भागातून निघाल्या होत्या. गिरीधर भवन चौकाजवळ भरधाव पिकअप गाडीने पादचारी रुणवाल यांना धडक दिली. अपघातात रुणवाल यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या पिकअप चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक शिरसाट तपास करत आहेत.

भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मोहंमद सलीम अब्दुलखलीद शेख (वय ६७, रा. नवभारत मित्र मंडळाजवळ, दापोडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार ज्येष्ठ नागिरकाचे नाव आहे. याबाबत शेख यांच्या पत्नीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार शेख हे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरुन निघाले होते. खडकी रेल्वे स्थानकासमोर भरधाव मोटारीने दुचाकीला समोरून धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता मोटारचालक पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेख यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक शरद देठे तपास करत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×