पतीच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या
Marathinews24.com
पुणे- पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने पंख्याला गळफास घेउन आत्महत्या केली आहे. ही घटना 11 एप्रिलला रात्री साडेदहाच्या सुमारास धायरीतील गजानन संकुलमध्ये घडली आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मल्लीकार्जुन मऱयाप्पा चलवादी (वय 26, रा. धायरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भिमाप्पा चौडप्पा चलवादी (वय 53, रा. मुंढवा) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
बंद फ्लॅटचे कुलूप तोडले, पावणेदोन लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार भिमाप्पा यांच्या मुलीचे आणि मल्लीकार्जुन यांचे काही महिन्यापुर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी पती मल्लीकार्जुनने पत्नीला त्रास देण्यास सुरूवात केली. सततच्या त्रासामुळे आणि होणाऱया मानसिक त्रासाला कंटाळून भिमाप्पा यांच्या मुलीने 11 एप्रिलला घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांना आरोपी मल्लीकार्जुन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित गुन्हा 13 एप्रिलला दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड तपास करीत आहेत.