सजग नागरिक मंचाकडून मागणी
marathinews24.com
पुणे – डेक्कन जिमखाना भागातील भिडे पूल सायंकाळी पाच ते रात्री अकरा यावेळेत वाहनांसाठी खुला ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. अन्य वेळी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यास मेट्रोला परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती वाहनचालकांना देण्यासाठी भिडे पुलाच्या दोन्ही बाजूस वाहतूक पोलिसांनी फलक लावावेत, अशी मागणी सजग नागरिक मंचाकडून करण्यात आली आहे.
खेळाडूंच्या जडणघडणीसाठी अंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसह उत्तम पायाभूत सुविधा देण्यावर भर – सविस्तर बातमी
सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांना निवेदन दिले आहे. भिडे पुलावरील वाहतूक बंदबाबतचे नियोजन करताना महापालिकेची परवानगी विचारात घेणे गरजेचे होते. भिडे पूल परिसरात मेट्रो पुलाचे काम सुरू आहे. हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. वाहतूक पोलीस, महापालिका आणि मेट्रो प्रशासनाने याबाबत संयुक्त समिती नेमावी. भिडे पूल परिसरातील कामाचा नियमित आढावा घेणे गरजेचे आहे. १५ डिसेंबरनंतर मेट्रोने परवानगी वाढवून मागितली, तर फक्त रात्रीच्या वेळीच कामाची परवानगी द्यावी, असे वेलणकर यांनी निवेदनात म्हटले आहे.






















