Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे पोलीस दलातील २५ अधिकारी-अंमलदारांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे सेवा पदक

उपायुक्त पिंगळे, शिंदे यांची बदली

marathinews24.com

पुणे – शासनाच्या गृहविभागाने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांची सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांची वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे पुणे पोलीस दलात आता दोन अधिकार्‍याच्या जागा रिक्त झाल्या असून, त्यांच्या जागी अजून कोणाचीही वर्णी लागली नाही. दरम्यान, सीआयडीच्या पुणे पोलीस अधीक्षकपदी महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती झाली आहे.

समृद्ध भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका महत्त्वाची : दीपक करंजीकर – सविस्तर बातमी

पुणे गुन्हे शाखेत कार्यरत असलेले निखील पिंगळे, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे या दोन पुण्यातील अधिकार्‍यांना पोलीस अधीक्षकपदाची लॉटली लागली आहे. तर सातार्‍याचे विद्यमान पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई याठिकाणी बदली झाली आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. एम. रमेश यांना गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्त केले आहे. श्रीकांत धिवरे हे जळगाव पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×