Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

मृद्ध भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका महत्त्वाची : दीपक करंजीकर

मृद्ध भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका महत्त्वाची : दीपक करंजीकर

तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता रोजगार निर्मितीकडे वळावे: दीपक करंजीकर यांचे प्रतिपादन

marathinews24.com

पुणे – समृद्ध भारत घडवण्यासाठी केवळ शासनाच्या योजना पुरेशा नाहीत, तर प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे योगदान देणे अत्यावश्यक आहे. तरुणांनी केवळ नोकरीकडे न पाहता रोजगारनिर्मितीकडे वळावे, नवीन संधी शोधाव्यात आणि देशाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रख्यात अर्थकारण व समाजकारण अभ्यासक दीपक करंजीकर यांनी केले.

खरीप हंगाम २०२६ च्या नियोजनसंदर्भात राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न – सविस्तर बातमी

नागरिक सोशल फाउंडेशन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले “समृद्ध भारत आणि मी” या विषयावरील व्याख्यानात करंजीकर बोलत होते, या प्रसंगी नागरिक सोशल फाउंडेशनचे संचालक  प्रितम थोरवे,अमेय सप्रे, शेखर यादव, वक्ता विभागाचे प्रमुख दीपक मेहेंदळे आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना करंजीकर म्हणाले,  भारताची समृद्धी ही केवळ आर्थिक बाबींवर अवलंबून नसून, सांस्कृतिक मूल्ये, नैतिकता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक एकता या घटकांवरही तितकीच अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले. डिजिटल युगात भारत वेगाने प्रगती करत असताना, त्या प्रगतीला योग्य दिशा देण्याची जबाबदारी युवकांवर आहे.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले. प्रश्नोत्तरांच्या सत्रात करंजीकर यांनी विद्यार्थ्यांच्या शंका समाधानकारक पद्धतीने दूर केल्या. यामुळे कार्यक्रम अधिक संवादात्मक आणि प्रभावी ठरला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×