Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

पुण्यात संततधार पावसामुळे ८ ठिकाणी झाडे कोसळली

अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेल्या झाडाच्या फांद्या छाटून रस्ता केला मोकळा

marathinews24.com

पुणे – संततधार पावसामुळे कात्रज बाह्यवळण मार्गावरील उंड्री परिसरात ओढ्याची भिंत कोसळून रस्त्यावर पाणी शिरल्याची घटना घडली. पावसामुळे शहर परिसरात ८ ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही.

अतिवृष्टीमुळे बाधीत भागाचे तत्काळ पंचनामे करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी – सविस्तर बातमी

शहर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील उंड्री परिसरात ओढ्यातील पाण्याची पातळी वाढली होती. पाण्याला जोर होता. जोरदार प्रवाहामुळे ओढ्याची संरक्षक भिंत कोसळून रस्त्यावर पााणी शिरले. या परिसरातील सोसायटी, तसेच दुकानांमध्ये पाणी शिरले होते. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या घटनेची माहिती महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाला रहिवाशांनी कळविली. महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाचा वापर करण्यात आला.

शहर परिसरात झालेल्या पावसामुळे ८ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. बावधनमधील विज्ञाननगर, ढोले पाटील रस्त्यावरील सेंट्रल माॅल परिसर, नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीजवळ, फरासखाना पोलीस ठाण्याच्या परिसरात, लोहगाव चौक, हडपसर भागातील सिजन माॅल, तसेच एरंडवणे भागातील खिलारेवाडी परिसरात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यात पडलेल्या झाडांच्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस माेकळे केले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×