Breking News
’जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यातील तीन वाहतूक अमलदारांचे तडकाफडकी निलंबनमोबाइल हिसकावणार्‍या दोघांना अटक, विश्रामबाग पोलिसांची कामगिरीवादातून तरूणावर वार, मांजरी बुद्रूकमधील घटनावादाचा बदला घेण्यासाठी टोळक्याचा राडा, वाहनांची केली तोडफोडट्रक चालकाने रस्त्यावरच वळण घेतले, मोटार चालकाचा मृत्यूDevendra Fadnavis : सर्व शासकीय कार्यालयत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपिस्तूलाच्या धाकाने मारहाण करणार्‍याला अटकअधिकाऱ्यांनो विकासकामे वेगाने व समन्वयाने करा; खासदार श्रीरंग बारणे यांच्या सूचना

ट्रक चालकाने रस्त्यावरच वळण घेतले, मोटार चालकाचा मृत्यू

ट्रक चालकाने रस्त्यावरच वळण घेतले, मोटार चालकाचा मृत्यू

वाघोलीतील गाडेवस्ती चौकातील घटना

marathinews24.com

पुणे – वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत ट्रक चालकाने अचानकपणे उजवीकडे वळण घेतल्यामुळे मोटार चालक तरूण धडकल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात ७ जूनला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील गाडेवस्ती चौकात घडला आहे. याप्रकरणी बेशिस्त ट्रक चालकाविरूद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज चंद्रकांत पाटील (वय ३७ रा. ढुढूळगाव, आळंदी देवाची) असे ठार झालेल्या तरूण मोटार चालकाने नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाउ अनिरूद्ध पाटील (वय २८) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

महापालिकेच्या जागांवर महामेट्रोचा डोळा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज पाटील हे आळंदी देवाची परिसरातील ढुढूळगावात राहायला होते. ते ७ जूनला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मोटारीतून वाघोलीतील गाडेवस्ती चौकात ढुढूळगावाकडे जात होते. त्यावेळी गाडेवस्ती चौकात एका ट्रक चालकाने अचानकपणे मुख्य रस्त्यावरच वळण घेतले. त्यामुळे युवराजचे मोटारीवरील नियंत्रण सुटून ट्रकला धडकला. गंभीररित्या जखमी झाल्यामुळे युवराजचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून, सीसीटीव्ही फुटेजसह ट्रक क्रमांकाच्या आधारे त्याचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top