पुण्यात गोरक्षकाच्या नावाखाली ट्रक चालकाला शेण खाउ घातले

पुण्यात गोरक्षकाच्या नावाखाली ट्रक चालकाला शेण खाउ घातले

स्वयंघोषित गोरक्षकासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – म्हैशीची वाहतूक करणार्‍या ट्रक चालकाला थांबवून त्याच्यावर धार्मिक टीकाटिप्पनी करीत चालकाला शेण खाउ घातल्याप्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना ६ मार्चला आंबेगाव परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दखल घेउन गुन्हा दाखल केला आहे. बीपाशा उर्फ आकाश राजू माणिकम (रा. गुरूनानक कॉलनी, कात्रज) हेमंत गायकवाड (रा. आंबेगाव) विराज सोले यांच्याविरूद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अमलदार गणेश शेंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

तब्बल २६७ बोगस कामगार दाखवून कंपनीला १ कोटींचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हशी घेउन वाहन चालक जात असताना आरोपींनी त्याला ६ मार्चला पहाटेच्या सुमारास अडविले. त्यानंतर पोलीस मार्शलच्या मदतीने त्याला ठाण्यात आणले होते. याप्रकरणी म्हैस वाहतूक आणि ट्रक चालकाला मारहाण अशा दोन अदखलपात्र नोंद करण्यात आली होती. दरम्यान, पोलीस अमलदार शेंडे यांना इन्स्टाग्रामवर व्हिडिओ दिसून आला. त्यामध्ये आरोपी बीपाशा उर्फ आकाश, हेमंत, विराज यांनी ट्रक चालकाला जातीवाचक शिवीगाळ केली. आरोपींनी चालकाल शेण खाउ घातले. धार्मिक टिप्पनी करीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आंबेगाव पोलीस तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×