टोळक्याकडून दहशत वाजवण्याची घटना
marathinews24.com
पुणे – नात्यातील तरुणीशी बोलल्याने एका तरुणासह त्याच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. टोळक्याने कोयते उगारून दहशत माजविली. दोघांवर कोयत्याने वार करुन टोळके पसार झाले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गणपती विसर्जन सोहळ्यात ध्वनी मर्यादेचे उल्लंघन – सविस्तर बातमी
नयन राम राडे (वय २५, रा. साईनगर, कोंढवा बुद्रुक) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. टोळक्याने केलेल्या मारहाणीत नयनचा मित्रही जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या एका आरोपीच्या बहिणीसोबत नयन बोलत होता. बहिणीसोबत बोलत असल्याने आरोपी त्याच्यावर चिडले होते. या कारणावरुन २४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास नयन आणि त्याचा मित्राला कोंढव्यातील साईनगर परिसरात आरोपींनी गाठले. आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. दोघांना मारहाण करुन दहशत माजविली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक पठाण तपास करत आहेत.
अरण्येश्वर भागात एकाला मारहाण
किरकोळ वादातून टोळक्याने एकाला मारहाण केल्याची घटना अरण्येश्वर भागातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वसाहतीत घडली. याप्रकरणी पर्वती पोलिसांकडून १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण आणि त्याच्या पत्नीत २४ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास वाद झाले. त्यांच्यात वाद सुरू असताना आरोपींनी तरुणाला शिवीगाळ केली. त्यानंतर तरुण आरोपींना जाब विचारण्यासाठी गेला. तेव्हा आरोपींनी तरु आणि मित्राला शिवीगाळ करुन मारहाण केली. दोघांना फरशीचा तुकडा आणि फळीने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक कोपनर तपास करत आहेत.























