Breking News
शेतात कापूस वेचणाऱ्या विवाहितेचा विनयभंगमुख्यमंत्र्यांनी दावोस मधून अनुभवला भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग ‘ग्रँड टूर’चा थरारपुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या ‘बोलक्या’; भिंतींवर साकारला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा!बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवला वेगवान थरारपुणे उत्तर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडारलढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ !!!पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला बेड्यामनी लॉड्रींगच्या धमकीने महिलेला गंडाकुख्यात घायवळ टोळीविरूद्ध ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्रजेष्ठाची सायबर चोरट्यांकडून तब्बल २२ कोटींची फसवणूक

क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून दोघांना मारहाण

क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून दोघांना मारहाण

गणेश पेठेतील घटना

marathinews24.com

पुणे – क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून टोळक्याने दहशत माजवून दोघांना मारहाण केल्याची घटना गणेश पेठ परिसरात घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अनिल मोतीलाल कल्याणकर (वय ४८, रा. श्री स्वामी समर्थ काॅम्प्लेक्स, दूधभट्टीसमोर, गणेश पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोथरुडमध्ये वादातून युवकाला मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणकर यांचा मुलगा आणि चुलत नातू हे रविवारी (३० नोव्हेंबर) दुपारी तीनच्या सुमारास क्रिकेट खेळून घराजवळ थांबले होते. क्रिकेट खेळताना त्यांचा काहीजणांशी वाद झाला होता. या घटनेनंतर आठ ते दहा जण तेथे आले. त्यांनी कल्याणकर यांचा मुलगा आणि नातवाला शिवीगाळ करुन मारहाण केली. या घटनेत दोघे जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षक जहाळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×