अपघाताच्या वादातून दोन गटात राडा

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ३२ कर्मचाऱ्यांची बदल्या

परस्परविरोधी गुन्हे दाखल, लोणी काळभोरमधील घटना

marathinews24.com

पुणे – वाहनाचा धक्का लागल्यामुळे झालेल्या बाचाबाचीतून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना ३१ डिसेंबरला रात्री सव्वा सातच्या सुमारास लोणी काळभोरमधील इनामदारवस्तीवर घडली आहे. याप्रकरणी दोन्ही गटाविरूद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पादचारी तरुणाच्या खुनातील आरोपी पसारच – सविस्तर बातमी

रिक्षाचा धक्का दुचाकीला लागल्यामुळे झालेल्या भांडणातून टोळक्याने कुटूंबियाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी मनसुर गनी इनामदार, रिहान मन्सुर इनामदार, जैद मन्सूर इनामदार, निहाल खालिद इनामदार, मन्सूर गनी इनामदार (सर्व रा. इनामदार वस्ती, लोणीकाळभोर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहीदा मुबारक इनामदार (वय ५० रा. इनामदार वस्ती ) यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करीत आहेत.

दुचाकीला रिक्षा चालकाने धक्का दिल्याच्या वादातून भांडण झाले. याप्रकरणी संबंधित कुटूंबियाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरून इब्राहिम इनामदार, रेश्मा हरून इनामदार, परवेझ हरून इनामदार, शायरा नजीर शेख, शाहरूख नजीर शेख, फरीन हरून इनामदार (सर्व रा. इनामदारवस्ती, लोणी काळभोर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मन्सूर गनी इनामदार वय ५३ यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पुजा माळी तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×