Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

Dive Ghat ST Bus Accident

नगर रस्त्यावरील वाघोली, तसेच भवानी पेठेतील टिंबर मार्केट भागात घडले अपघात

marathinews24.com

पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली, तसेच भवानी पेठेतील टिंबर मार्केट भागात अपघात घडले. नगर रस्त्यावरील वाघोली भागात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

विद्यापीठाच्या वसतीगृहातून विद्यार्थ्याच्या लॅपटाॅप चोरी – सविस्तर बातमी 

रोहितकुमार अरुण बर्नावळ (वय १९) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार अशोक माने यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रोहितकुमार हा १३ सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास नगर रस्त्याने निघाला होता. त्यावेळी वाघोली परिसरात भरधाव वाहनाने पाठीमागून दुचाकीला धडक दिली. अपघातात रोहितकुमार गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करत आहेत.

भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरात ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्याची ओळख पटली नाही. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास टिंबर मार्केट परिसरात ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. तो फिरस्ता असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×