पुण्यात स्लॅब कोसळून दोन मजूर जखमी

ढोले पाटील रस्त्यावरील घटना

marathinews24.com

पुणे – हॉटेलच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना स्लॅब कोसळून दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दि. १९ दुपारच्या सुमारास ढोले- पाटील रस्त्यावर घडली. स्लॅबच्या राडारोड्याखाली अडकलेल्या मजुरांना अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.

पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड – सविस्तर बातमी

पुणे स्टेशन परिसरातील ढोले-पाटील रस्त्यावर हॉटेलच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. स्लॅबच्या जवळ काम करणारे दोन मजूर राडारोड्याखाली अडकले गेले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. राडारोड्याखाली अडकलेल्या दोन मजुरांना तातडीने बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन मजुरांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोन मजुरांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांंनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×