भाडेकरूंची माहिती लपवली; दोघा घरमालकांवर गुन्हे दाखल
marathinews24.com
पुणे – भाडेकरूंची माहिती पोलिसांना न देणे दोन घरमालकांना भोवले आहे. संबंधित घरमालकांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भाडेकरू तपासणी व हॉटेल, लॉजेस चेकिंग, धर्मस्थळ व गर्दीच्या ठिकाणी भेटी देण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी दोन पथके स्थापन केली होती. त्यानुसार पथकाकडून ठिकठिकाणी भाडेकरूंची माहिती एकत्रित केली जात होती. मात्र, २ घर मालकांनी भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात सादर न केल्याने संबंधित घरमालकांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरदिवसा घरफोडी, सव्वा दोन लाखांचे दागिने लंपास – सविस्तर बातमी
भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून यापुढेही भाडेकरू तपासणी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली आहे.