Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

सायबर चोरट्यांकडून दोघांची १ कोटी २६ लाखांची फसवणूक

तरुणाला शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली १७ लाखांना

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांत ज्येष्ठ नागरिकासह दोघांची १ कोटी २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाणे आणि खडक पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शेअर आयपीओमध्ये गुंतवणूकीचे आमिष, जेष्ठेला ४१ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

धनकवडी भागात राहणाऱ्या एका ५६ वर्षीय महिलेला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी ८४ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तक्रारदार महिलेने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ८४ हजार ६८ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर महिलेला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.

अशाच पद्धतीने गुरुवार पेठ परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी ४२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×