Breking News
विशेष मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरत आहे ‘साहस फाउंडेशन’गणेशभक्तांसाठी मोफत पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन सेवापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ – विशेष लेखकोथरूडमध्ये तरुणावर शस्त्राने वार; तिघांविरुद्ध गुन्हापुण्यात वस्त्रदालनातून साडेचार लाखांची रोकड लंपासगोळीबार करणारा बिष्णोई टोळीतील एक जण ताब्यातपालखी सोहळ्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून पाच हजारांचा बंदोबस्तसिंहगड किल्ला, वरंधा घाटात दरड कोसळलीविवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे आवाहनपवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार

पुण्यात दंडात्मक कारवाईऐवजी पैसे उकळले; दोन वाहतूक पोलीस निलंबित

पुण्यात कॅफेतील गैरवर्तन भोवले; पोलीस उपनिरीक्षक निलंबित

पोलीस उपायुक्त हिंंमत जाधव यांचे आदेश

marathinews24.com

पुणे – वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या वाहतूक शाखेतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले. सोशल मीडियावर चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदार अंकुश रामा पवार, लक्ष्मण बालाजी रामगडे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.

मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरी – सविस्तर बातमी 

पवार आणि रामगडे हे सहकारनगर वाहतूक शाखेत नियुक्तीस आहेत. १९ एप्रिलला दोघेजण शारदा आर्केड चौकात वाहतूक नियमन करत होते. सिग्नल मोडून निघालेल्या दुचाकीस्वारांविरुद्ध ते कारवाई करत होते. कारवाई सुरू असताना दुचाकीस्वाराने मोबाइलवरुन संबंधित घटनेचे चित्रीकरण करुन समाजमाध्यमात प्रसारित केले. त्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेऊन वाहतूक शाखेतील अधिकााऱ्यांनी दोघांचे जबाब नोंदविले. वाहतूक नियमन करणारे पोलीस कर्मचारी पवार आणि रामगडे यांनी तीन वाहन चालकांकडून ऑनलाइन पद्धतीने स्वत:च्या खात्यात ५०० रुपये जमा करुन घेतल्याचे उघड झाले.

दंडात्मक कावराईऐवजी त्यांनी स्वत:च्या खात्यात पैसे जमा करुन घेतल्याचे उघड झाले. पवार आणि रामगडे यांचे वर्तन बेशिस्त, बेजबाबदा आमि पोलीस दलाची प्रतिमा मलीन कणारे असल्याचा ठपका ठेऊन त्यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले.

शहरातील प्रमुख चौक, तसेच रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येते. वाहतूक नियमन करण्यास प्राधान्य देण्याऐवजी बऱ्याचदा वाहतूक पोलीस घोळक्याने थांबून कारवाई करतात. याबाबतच्या तक्रारी नागरिकांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केल्या होत्या. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी घोळक्याने कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचारी आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×