दुचाकी चोरट्यांना अटक, दोन दुचाकी जप्त

हत्यार हवेत फिरवत धमकी देणारा गजाआड

समर्थ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – दुचाकी चोरट्यांना अटक, दोन दुचाकी जप्त – दुचाकी चोरणार्‍या दोघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सागर वसंत शिंदे वय ३० रा. सुतारवाडी रास्ता पेठ आणि सुबोजित राजेंद्र दास ( वय २८ रा. राजेवाडी, भवानीपेठ, मुळ पत्ता-रा. हुगळी, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदाराने रास्ता पेठेत दुचाकी के. के. मोटर्सजवळ पावर हाऊस चौकात पार्क केली होती. चोरट्याने दुचाकी चोरी केली होती. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

बेशुद्धावस्थेत सापडलेल्या मुलीच्या उलट सुलट जबाब – सविस्तर बातमी 

पोलीस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख, शरद घोरपडे यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन त्यांनी आरोपीचा माग काढला. आरोपी सागर शिंदे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच आरोपी सुबोजित दास यालाही पथकाने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने नाना पेठ येथुन दुचाकी चोरल्याचे सांगितले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक चेतन मोरे, उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पागार, औचरे, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली.

दुभाजकावर आदळून रिक्षाचालकाचा मृत्यू, चांदणी चौकातील घटना

पुणे – भरधाव रिक्षा दूभाजकावर आदळून रिक्षाचालक मृत्युमुखी पडल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर चांदणी चाैकात सोमवारी मध्यरात्री घडली. गणेश कोळस्कर (रा. धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. रिक्षाचालक कोळस्कर हा बाह्यवळण मार्गावरुन मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव वेगात निघाला होता. चांदणी चौकाजवळ भरधाव रिक्षा दुभाजकावर आदळली. अपघातात रिक्षाचा चुराडा झाला.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. रिक्षात अडकलेल्या रिक्षाचालक कोळस्कर याला बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेतील कोळस्करला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्यचाी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.

अपघात नेमका कसा झाला, याची माहिती पोलिसांना मिळाली नाही. भरधाव वाहनाने रिक्षाला धडक दिली किंवा रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे उपनिरीक्षक पाटील यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×