बेशुद्धावस्थेत सापडलेल्या मुलीचे उलट सुलट जबाब

बेशुद्धावस्थेत सापडलेल्या मुलीचे उलट सुलट जबाब

पोलिसांपुढेही तपासाचा पेच, पीडितेने ३ वेळा बदलला जबाब

marathinews24.com

पुणे – बेशुद्धावस्थेत सापडलेल्या मुलीचे उलट सुलट जबाब – झुडपात बेशुद्धावस्थेत सापडलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विसंगत जबाबामुळे चंदननगर पोलिसांनाही चक्रावून टाकणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. १७ जुलै दुपारी घडलेल्या घटनेनंतर मुलीने तीन दिवसांत तीन वेळा जबाब बदलले असून, तिच्या घरच्यांनी सुरुवातीला तक्रारही दिली नव्हती. या सर्व प्रकरणामुळे नेमके काय घडले, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्यात बांग्लादेशींची धरपकड, १५ महिलांना डिपोर्ट करणार – सविस्तर बातमी 

खराडी परिसरात झुडपात बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या पीडितेला पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. १८ जुलैला शुद्धीवर आल्यानंतर तिने पहिल्यांदा सांगितले की, भाजी मंडईतून परतताना तीन अनोळखी लोकांनी मारहाण केली आणि ती घाबरून झुडपात लपली. मात्र, पुढील जबाबात तिने सांगितले की, आरोपींनी तिला वाघोलीत नेऊन डोक्यात मारले. या आधारावर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रात्रभर शोध घेऊन पोलिसांनी खुळेवाडीतील ३० आणि ३१ वर्षीय दोन मित्रांना पकडले. मात्र, त्यांनी वेगळीच कहाणी सांगितली. तिने दारू मागितली, आम्ही तिला दिली, परत येताना ती घसरून पडली, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्या दिवशी नेमके काय घडले, असा पेच निर्माण झाला आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पीडित मुलगी सापडल्यापासून रुग्णालयात उपचार घेत आहे. तिने आतापर्यंत वेगवेगळे जबाब दिले असून, त्या आधारे आम्ही दोघांना अटक केली आहे. मुलगीही सामान्य घरातील असून, तिच्या मणक्याला दुखापत झाल्याने तिला पॅरालिसिस झाला आहे.आमच्याकडूनही प्रकरणाचा तपास सुरू असून, या प्रकरणात नेमके काय घडले, याचा शोध घेत आहोत, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×