पुण्यात बांग्लादेशींची धरपकड, १५ महिलांना डिपोर्ट करणार

आपल्यात बांगलादेशी धरपकड, १५ महिलांना डिपोर्ट करणार

८ पथकांकडून कारवाईचा बडगा-पोलीस आयुक्त अमितेश कुमार

marathinews24.com

पुणे – आपल्यात बांगलादेशी धरपकड, १५ महिलांना डिपोर्ट करणार – शहरातील विविध भागात छुप्या पद्धतीने राहणार्‍या बांग्लादेशीविरूद्ध पुणे पोलिसांनी मोहिम हाती घेतली आहे. १५ जुलैपासून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या ८ पथकांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार १५ बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेतले असून, २२ जुलैला संबंधित बांग्लादेशींना डिपोर्ट केले जाणार आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

लोकल रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात देणार आव्हान – सविस्तर बातमी 

देशाची सीमा पार करुन बांग्लादेशी महिला हिंदुस्थानात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पुण्यात धाव घेत आपण पश्चिम बंगालमधील रहिवाशी असल्याचे सांगितले होते. पुण्यातील रेडलाईट एरियामध्य वेश्या व्यवसायाचा मार्ग पत्करला होता. वेश्याव्यवसाय करुन, त्यांची उपजिवीका भागवित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना ताब्यात घेउन, पोलिसांनी नुकतीच कायदेशीर कारवाई केली होती. त्याचसोबतच शहरातील विविध भागातही बांग्लादेशीविरूद्ध कारवाईची मोहिम राबविण्यात आली. १५ महिलांना ताब्यात घेउन त्यांना महिला रेस्क्यू विभागात ठेवण्यात आले होते. कागदोपत्री प्रक्रिया पुर्ण झाली असून, २२ जुलैला महिलांना त्यांच्या देशात पाठविले जाणार आहे.

ठाणे प्रमुखांनी विशेष लक्ष देण्याचे आदेश

प्रत्येक ठाणे प्रमुखांनी आपआपल्या हद्दीत विशेष लक्ष ठेउन बेकायदा वास्तव्य करणार्‍या बांग्लादेशी नागरिकांविरूद्ध कारवाई करावी. त्यांची माहिती गोळा करीत तत्काळ रिपोर्ट तयार करावा. बांग्लादेशींना राहण्यासाठी मदत करणार्‍या स्थानिकांचीही खरडपट्टी काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बांग्लादेशींबाबत विशेष मोहिमेतून कठोर कारवाईत हयगय न करण्याचे सूचित करण्यात आले आहे.

वैध परवान्याशिवाय शहरात येउन छुप्या पद्धतीने वास्तव्य करणार्‍या बांग्लादेशी नागरिकांविरूद्ध मोहिम हाती घेतली आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांकडून कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार १५ बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेतले होते.त्यांना मायदेशी पाठविले जाणार असून, कारवाईची मोहिम अशीच सुरू ठेवली जाणार आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×