Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते लिंगभाव समावेशनावरील आशियातील पहिल्या युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन

आशियातील पहिल्या युनेस्को ‘लिंगभाव समावेशन’ अध्यासनाचे पुण्यात उद्घाटन

marathinews24.com

पुणे – केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी आज आज ‘लिंगभाव समावेशन आणि कौशल्य विकास’ या विषयावरील युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन केले. सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयू), पुणे येथे युनेस्कोच्या सहकार्याने आयोजित ‘विमेन लीडिंग द फ्युचर ऑफ वर्क’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचा हा एक भाग होता.

मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्द – सविस्तर बातमी

चौधरी यांच्या हस्ते या अध्यासनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, नॉर्वेच्या महावाणिज्य दूत मोनिका नागेलगार्ड, एसएसपीयूच्या प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री चौधरी म्हणाले, भारताच्या विकासाची दिशा केवळ त्याच्या व्याप्तीवरूनच नव्हे, तर आपण आपल्या लोकांना किती समावेशकपणे सक्षम करतो, यावरून निश्चित होईल. ते म्हणाले की, युनेस्को  चेअर सारखे उपक्रम हे सुनिश्चित करतात की, सेमीकंडक्टर्स, प्रगत उत्पादन आणि आधुनिक काळातील तंत्रज्ञान यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर असतील. जेव्हा कौशल्य विकास हा उद्योगांच्या मागणीनुसार असतो, आणि समतेच्या तत्त्वावर आधारित असतो, तेव्हा तो आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन या दोन्ही गोष्टींना चालना देणारा शक्तिशाली घटक ठरतो, असे त्यांनी नमूद केले.

तटकरे यांनी वंचित समाजातील महिलांपर्यंत पोहोचण्याच्या आणि त्यांना खऱ्या संधी मिळवून देणाऱ्या कौशल्यांनी सक्षम करण्याच्या उपक्रमाची प्रशंसा केली. महिलांमध्ये आत्मविश्वास, स्वातंत्र्य आणि दीर्घकालीन सक्षमीकरण निर्माण करण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे आहेत, असे त्या म्हणाल्या.

‘विमेन लीडिंग द फ्युचर ऑफ वर्क’ या विषयावरील या आंतरराष्ट्रीय परिषदेत, उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये आणि भविष्यातील रोजगाराच्या भूमिकांमध्ये महिलांचा सहभाग बळकट करण्यावर विचारमंथन करण्यासाठी जागतिक संस्था, धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील धुरीण आणि शिक्षणतज्ज्ञ यांना एकत्र आले. ‘युनेस्को चेअर’ चा यशस्वी शुभारंभ आणि ही आंतरराष्ट्रीय परिषद, भारताला कौशल्य विकास आणि समावेशक मनुष्यबल परिवर्तनामध्ये जागतिक नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे.

या परिषदेत संरक्षण तंत्रज्ञान, रोबोटिक्स, इंडस्ट्री 4.0, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि जागतिक क्षमता केंद्रे यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमधील रोजगाराच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विशिष्ट संकल्पनांचा समावेश होता. या परिषदेत विविध कंपन्यांमधील 40 हून अधिक प्रतिष्ठित उद्योजकांनी प्रमुख वक्ते आणि पॅनेल सदस्य म्हणून आपले योगदान दिले. या परिषदेत पुढील जागतिक तज्ञांची प्रमुख भाषणे होती: मेरी ओव्हरिंग्टन, व्यापार आणि गुंतवणूक आयुक्त (दक्षिण आशिया), गॅब्रिएल बोर्डाडो, कौशल्य तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, सोलेदाद पॅटिनो, युनेस्को ग्लोबल स्किल्स अकादमी, पॅरिस, आणि प्रिसिला वांजिकू गटोनी, युनेस्को – यूएनईव्हीओसी, जर्मनी, यांच्यासह आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील इतर मान्यवरांनी सहभाग घेतला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×