Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुणे पोलीस भरतीत ‘एआय’चा वापर

पुणे पोलीस भरतीत ‘एआय’चा वापर

भारती प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा बसण्यास होणार मदत

marathinews24.com

पुणे – शहरात पोलीस भरती प्रक्रियेत पुणे पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यात येणार आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. लेखी, मैदानी चाचणी स्पर्धेत तोतया उमेदवार सहभागी होत असल्याने ‘फेस रेकग्नेशन’ कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे.

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील – सविस्तर बातमी 

पुणे पोलीस दलातील १ हजार ८३३ पोलीस शिपाई पदाच्या जागांसाठी आतापर्यंत ८६ हजार २४० अर्ज दाखल झाले आहेत. कारागृह विभागातील शिपाई पदाच्या १३० जागांसाठी ९० हजार ७९१ अर्ज दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रियेसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. बऱ्याचदा भरतीप्रक्रियेत गोंधळ उडतो; तसेच मैदानी चाचणी स्पर्धेत काही उमेदवार गैरप्रकार करतात. मूळ उमेदवाराऐवजी दुसरे उमेदवार मैदानी स्पर्धेत सहभागी होतात. त्यामुळे यंदा भरतीप्रक्रियेत ‘फेस रेकग्नेशन’ कॅमेऱ्यांचा वापर करण्यत येणार आहे.

उमेदवारांची छायाचित्रे, त्यांची माहिती या कॅमेऱ्यांकडे असणार आहे. मूळ उमेदवाराऐवजी दुसरी व्यक्ती सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्वरित सूचना दिली जाणार आहे. शारीरिक मोजमाप, स्वच्छतागृहातून बाहेर पडणारे उमेदवारांचे चेहरे हे कॅमेरे टिपतील. जेणेकरून मैदानी स्पर्धेत गैरप्रकार होणार नाहीत. मैदानी चाचणीत धावणाऱ्या उमेदवारांनी किती वेळेत अंतर पूर्ण केले, याबाबतची माहिती देण्यासाठी मैदानावर सेन्सर बसविण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×