भाजप महिला आघाडीकडून सुश्रुत घैसास यांच्या वडीलांच्या हॉस्पिटलचे नुकसान
Marathinews24.com
पुणे– पैशासाठी गर्भवती महिलेवर उपचार न केल्यामुळे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. तनिशा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून उपचारासाठी पैशांची अडवणूक केली. त्यामुळे आमच्या मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाबाबत संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
डेटिंग ॲप वरून झालेली ओळख पडली महागात सव्वा लाखात – सविस्तर बातमी
रुग्णालयात प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे शहरातील ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आमनेसामने आले होते. रुग्णालय प्रशासनाने विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कारवाईची मागणी केली. आंदोलना दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर प्रसार माध्यमांसमोर भूमिका मांडण्यास आले होते. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिरीष याडकीकर यांच्या तोंडावर चिल्लर फेकल्याची घटना घडली. तर ही घटना थांबत तोवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डला पतितपावन संघटनेकडून काळे फासून निषेध नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर भाजप महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी रुग्णालयात समोर आंदोलन केले. तनिशा भिसे यांच्या कुटुंबियांना उपचारासाठी १० लाख रुपये भरावे लागतील,अशी मागणी करणार्या सुश्रुत घैसास यांच्या वडिलांचे अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड करीत केली.
सुश्रुत घैसास हा माझा मुलगा आहे. पण त्याचा या रुग्णालयाशी काही संबंध नाही. विनाकारण आमच्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. आमच्या परिवाराला त्रास दिला जात आहे. मी आणि माझे पती तसेच दुसरा मुलगा ४० वर्षापासून रुग्णालय चालवत आहोत . त्याने रुग्णालयाच्या नियमानुसार पैसे मागितले असतील. – डॉ. नीलिमा घैसास