Breking News
MPSC Group C Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी पदसंख्येत वाढJyoti Savitri School Khanwadi : महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष : परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा!Birsa Munda Seva Saptah 2026 : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभMahajyoti Pune News : महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचे

फुरसुंगीत वाहनांची तोडफोड, तिघांविरुद्ध गुन्हा

विजेच्या धक्क्याने बांधकाम मजुराचा मृत्यू

फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – फुरसुंगीत वाहनांची तोडफोड, तिघांविरुद्ध गुन्हा – शहरात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. हडपसर परिसरातील फुरसुंगी भागात गुरुवारी मध्यरात्री टोळक्याने मोटारी, दुचाकींची तोडफोड केल्याची घटना घडली. दाेन दिवसांपूर्वी धनकवडी, विश्रांतवाडी भागात वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. याबाबत शशिकांत गायकवाड (वय ३३, रा. ॲरो विहार सोसायटी, त्रिवेणीनगर, फुरसुंगी, हडपसर) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अरुण यादव (वय २०), नयन भोसले, मनोज उर्फ अभिषेक (तिघेही रा. शेवाळवाडी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेत भरणा करण्यासाठी दिलेली रोकड लांबवून नोकर पसार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२४ जुलै) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास आरोपी दुचाकीवरुन ॲरो विहार सोसायटी परिसरात आले. त्यांच्याकडे कोयते आणि दांडके होते. आरोपींनी शिवीगाळ करुन दहशत माजविली. आरोपींनी त्रिवेणीनगर भागात रस्त्यावर लावलेल्या मोटारी, तसेच दुचाकींची तोडफोड केली. पोलीस हवालदार बोबडे तपास करत आहेत. धनकवडी परिसरात नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या टोळीचा सहकारनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुण आरोपींसह तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

आरोपी आखाड पार्टी करून वाढदिवस असलेल्या अल्पवयीन मुलाला भेटण्यास त्या परिसरात आले होते. मात्र, मित्राने भेटण्यास नकार दिल्याने आरोपींनी रागाने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होतेे.

‘आम्ही धनकवडीचे भाई आहोत, आमच्या नादाला लागायचं नाही,’ असे आरडाओरड करत बुधवारी (२३ जुलै) मध्यरात्री १५ रिक्षा, दोन मोटार आणि एका व्हॅनची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी सराइत गुन्हेगार रोहित कैलास आढाव (२१, रा. किरकटवाडी) याने त्याच्या साथीदारांसह केला आहे. त्यानुसार पोलिसांनी नवले पूल परिसरात सापळा रचून आढाव आणि सुधीर बाप्पू सावंत (१९, रा. गोरावी वस्ती, नांदेड फाटा) यांना अटक करण्यात आली. चौकशीत वाहन तोडफोड प्रकरणात तीन अल्पवयीना सामील असल्याचे उघडकीस आले. बुधवारी सायंकाळी एका अल्पवयीनाकडून विश्रांतवाडी भागात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती.

कोंढव्यात दोन दिवसांपूर्वी एका किराणा दुकानात शिरून टोळक्याने हल्ला केला होता. खाद्यपदार्थांची पाकिटे फेकून दिले होते. दुकानासमोर लावलेली रिक्षाची काच फोडण्यात आली होती. भवानी पेठेतील मंजुळाबाई चाळीत टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली होती.गेल्या काही दिवसात शहरात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ओैंधमधील विधाते वस्ती परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. सिंहगड रस्त्यावरील माणिकबागेत टोळक्याने १५ वाहनांची तोडफोड केली होती. शहरात किरकोळ वादातून दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत.

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे-भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुकुंदनगर भागात घडली. याप्रकरणी पसार झालेल्या मोटार चालकाविरुद्ध स्वारगेट पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकेश देवीलाल गुजर (वय २८, रा. झांबरे पॅलेसजवळ, महर्षीनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सुरेश गायकवाड यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मुकेश १९ जुलै रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मुकुंदनगर परिसरातील रांका हाॅस्पिटल परिसरातून निघाला होता. त्या वेळी भरधाव मोटारीने दुचाकीस्वार मुकेश याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुकेश याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक कोतकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×