Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

‘वंदे भारत’ रुळावरून घसरली

'वंदे भारत' रुळावरून घसरली

पुणे रेल्वे स्थानकातील घटना, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

marathinews24.com

पुणे – वंदे भारत एक्सप्रेसचा डब्बा पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करताना रुळावरून घसरल्याने अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नसून, प्रवाशांना मात्र दूरवर चालत येण्याचा मनस्ताप सहन करावा लागला. पुणे स्थानकाच्या डायमंड क्रॉसिंगवर ही घटना सोमवारी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास घडली. सर्व प्रवाशी सुखरूप असून रेल्वेचेही मोठे नुकसान झाले असल्याची माहीती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

आंबेडकरी चळवळ कोणाच्याही आरक्षणाच्या विरोधात नाही; पण अन्यायकारक उपवर्गीकरण खपवून घेतले जाणार नाही! – सविस्तर बातमी 

मुंबई- सोलापूर वंदे भारत (गाडी क्रमांक २२२२५) एक्सप्रेस पुणे स्थानकाच्या फलाटावर येत होती. त्यावेळी डायमंड क्रॉसिंगवरून जात असताना चौथ्या डल्याला झटका बसल्याने डब्याची एक ट्रॉली फलाट क्रमांक तीनवरील रुळावरून घसरली. सुदैवाने, गाडीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी तसेच प्रवाशांना दुखापत झालेली नाही. रेल्वे प्रशासनाने तातडीने मदतकार्य राबवून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. मात्र या घटनेमुळे प्रवाशांत प्रचंड भितीचे वातावरण पसरले होते. गाडी रूळावरून घसरताच प्रवाशांनी प्रचंड आरडा-ओरडा सुरू केला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. डबा घसरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रशासन तातडीने मदतीला आले.

अपघातानंतर ही गाडी जाग्यावर थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र पर्यायी गाडीची व्यवस्था करून प्रवाशांना रवाना करण्यात आले. देशातील सर्वात सुरक्षित आणि अत्याधुनिक मानल्या जाणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचा २०१९ मध्ये शुभारंभ झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या गाडीचा अशा प्रकारे रुळावरून घसरण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे सांगितले जात आहे. ज्या डायमंड क्रॉसिंगवर हा अपघात झाला, त्या क्रॉसिंगच्या अद्यावतीकरणाचे काम पुणे स्थानकाच्या ‘यार्ड रिमॉडेलिंग’ प्रकल्पांतर्गत आधीच नियोजित आहे. हे काम प्रलंबित असतानाच हा अपघात घडल्याने रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. घटनेमुळे पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक गाड्या उशिराने धावत असून, रेल्वे कर्मचारी युद्धपातळीवर रुळाचे काम दुरुस्त करून वाहतूक पूर्वचत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×