Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

वाहन चोरट्याची शक्कल, चोरीच्या वाहनाला बनावट क्रमांक

वाहन चोरट्याची शक्कल, चोरीच्या वाहनाला बनावट क्रमांक

आरोपीला बाणेर पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – वाहन चोरट्याने शक्कल लढवून चोरीच्या वाहनाला बनावट क्रमांक टाकून ती स्वतःची असल्याचे भासवले. मात्र, नाकाबंदीवेळी बाणेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना ६ एप्रिलला संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बाणेर परिसरात नाकाबंदीवेळी उघडकीस आली आहे. तुकाराम संदीपान खांडेकर (वय ३८ रा. आंबेगाव खुर्द, कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार स्वप्नील मराठे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात सायबर चोरट्यांकडून ऑनलाईन लुटीचा सपाटा सुरूच – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अमलदार संदीप मराठे हे बाणेर पोलीस ठाण्यात नियुक्तीला आहेत. ६ एप्रिलला ते पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदीत काम करीत होते. त्यावेळी त्यांनी एका वाहन चालकाला (एमएम १० डीवाय ३४५७) थांबवून कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी संबंधिताने कागदपत्रे नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्यामुळे आरोपी तुकाराम खांडेकर याला पोलिसांनी ठाण्यात आणून चौकशी केली. त्यावेळी त्याने ताब्यातील ५ लाखांचे वाहन चोरी करून दुसर्‍या वाहनाचा बनावट क्रमांक टाकल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×